राज्य निवडणूक आयोगाने पुणे महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेला मान्यता दिली असून, सोमवारी ही प्रभाग रचना जाहीर होणार आहे. प्रारूप प्रभाग रचनेतील हरकती सूचनांवर सुनावणी घेतली असली तरी प्रसिद्ध होणाऱ्या प्रभाग रचनेमध्ये बदल राजकीय सोय बघून होणार असल्याची चर्चा पुण्यात नव्याने सुरु झाली आहे. पुणे महापालिकेची 2017ची प्रभाग रचना लक्षात घेता दक्षिण उत्तर सरळ रेषेमध्ये असलेल्या प्रभागांमध्ये प्रचंड बदल करत फेरफार करण्याचे काम प्रारूप प्रभाग रचनेमध्ये करण्यात आले होते. यामध्ये प्रभाग क्रमांक ३,४,६ पासून सुरुवात झाल्यानंतर सरळ पुन्हा टेशन पेठ विभाग आणि बिबेवाडी कात्रज धनकवडी या भागात प्रचंड प्रमाणात प्रभागाच्या हरकतीमध्ये बदल करण्यात आले. विरोधी पक्षातील सर्व इच्छुकांनी याबाबत हरकती सूचनांचा पाऊस पडला असला तरी सुद्धा प्रत्यक्षात अंतिम प्रभाग रचनेमध्ये काय बदल होणार हा खरा चर्चेचा विषय आहे. मोठा प्रचंड राजकीय प्रभावाने बनवण्यात आलेल्या या प्रभाग रचनेमध्ये अंतिम क्षणी अजितदादा पवार यांनी लक्ष घालून आपल्या पक्षातील नगरसेवकांसाठी सुखर निर्णय घेतले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवकांना या प्रारूप प्रभाग रचनेमध्ये काही ठिकाणी हद्दीचा तर काही ठिकाणी आरक्षणाचा फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन येनवेळी प्रभागांच्या रचनेमध्ये बदल करण्यात आल्याच्या चर्चा स्थानिक पातळीवर ती रंगू लागले आहेत.






सत्ताधारी पक्षातील तिन्ही पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या प्रभाग रचनेत नाराज असल्याचे चर्चा सुरुवातीला जोरात सुरू होत्या परंतु राज्य शासनाकडे प्रभाग रचना जमा झाल्यानंतर यामध्ये बदल झाले असल्याची चर्चाही सुरू आहे. प्रारूप प्रभाग रचनेमध्ये अंतिम प्रभाग रचना करताना खूप मोठे बदल शक्य नसले तरी सुद्धा आरक्षण आणि काही निवडक भाग कमी जास्त करण्यासाठी राजकीय वजनाचा फायदा करण्यात आल्याने 15 प्रभागांच्या हद्दी बदल झाला आहे. त्यामुळे अंतिम झालेल्या प्रभाग रचनेत महायुतीमधील कोणत्या पक्षाने कुरघोडी केली हे यातून स्पष्ट होणार आहे. आगामी महापालिकेची निवडणुकीसाठी २०११ या वर्षाची लोकसंख्या गृहित धरुन प्रभाग रचना करावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने ३४ लाख ८१ हजार ३५९ लोकसंख्या लक्षात घेत प्रभागरचना केली आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या ४ लाख ६८ हजार तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या ४० हजार आहे.
या लोकसंख्येच्या आधारे १६५ नगरसेवकांची निवड करण्यात येणार असून, यासाठी ५ सदस्यांचे ४० आणि ५ सदस्यांचा एक असे मिळून ४१ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. यावर ५ हजार ९२२ हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या सुनावणीमध्ये सुमारे ८०० नागरिकच उपस्थित राहिले होते. यामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जाती जमातीचे आरक्षीत प्रभाग बदलणे, प्रभागाची नावे बदलावीत अशा हरकतींचा समावेश होता.
राज्य शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी हरकती सुनावणीचा अंतिम अहवाल राज्य सरकारला सादर केला. त्यानंतर शासनाने हा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर केला. अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यासाठी ६ ऑक्टोबर पर्यंतची मुदत निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे.
त्यामुळे आयोगाने आज शुक्रवारी पुणे महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेला मंजुरी दिली आहे. शनिवारी व रविवारी शासकीय सुट्टी असल्याने या दिवशी प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता कमी नाही. प्रभाग रचनेचे गॅझेट, नकाशे हे सोमवारी जाहीर होतील, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
दादांच्या नाराजीनंतर बदल होणार का?
प्रारूप प्रभाग रचनेमध्ये पुण्यातील अनेक प्रस्थापित नगरसेवकांना, विरोधी पक्षांना प्रतिकूल प्रभाग रचना झाल्याने वाद निर्माण झाला आहे. ही प्रभाग रचना भाजपला फायदेशीर असल्याचे सांगितले जात असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यावर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे महायुतीमधील वाद समोर आला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचे असणारे प्रभाग हे हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघात आहेत. त्यामुळे दादांच्या नाराजीनंतर अंतिम प्रभाग रचनेत तेथे काय बदल होतात याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. या प्रभाग रचनेचा शासकीय आदेश सोमवार पर्यंत जाहीर होईल.’
– प्रसाद काटकर, उपायुक्त, निवडणूक शाखा












