पुणे शहर भाजपचे एकीकडे पन्ना प्रमुखांचे सूक्ष्म नियोजन तर दुसरीकडे 7व्या माळेच्या ‘बिग इन्कमिंग’ चे आयोजन

0

पुणे शहर भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी पक्षाने संपूर्ण रणनीती आखली आहे. प्रत्येक प्रभागात बूथ स्तरावर कार्यकर्त्यांची नेमणूकही केली आहे. संघटनात्मक ताकदीच्या जोरावर पक्ष स्वबळावर लढण्यासाठी सज्ज आहे. अशातच पुण्यातून पित्र पंधरावड्यानंतर पक्षांतराबाबतच्या नव्या चर्चांना उधाण आले असून नवरात्र उत्सवाच्या काळात सातव्या माळेला मोठे प्रवेश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे शहरामध्ये असलेल्या आठ विधानसभा मतदारसंघांपैकी (कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट व खडकवासला) सहा आमदार हे भाजपचे आहेत. तर एक आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि एक आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वडगाव शेरी मतदारसंघात आहे.

महाराष्ट्र राज्यात सर्वात प्रथम 2014 मध्ये जवळजवळ एक हाती सत्ता आल्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने पुणेरी नस ओळखत २०१७ च्या निवडणुकीत भाजपने ९७ जागा जिंकून सत्ता मिळवली होती. त्यावेळीही स्थानिक पातळीवर आपापल्या भागात प्रभावी असणाऱ्या कार्यकर्त्यांचा भरमसाठ प्रवेश घेऊन सत्ता काबीज केली होती. याच घटनेची पुनरावृत्ती करून यंदाही सर्वच जागांवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने लक्ष केंद्रीत केले असून सूक्ष्म नियोजनाचा भाग म्हणून बलस्थाने असलेल्या कोथरूड कसबा शिवाजीनगर पर्वती मतदारसंघातील प्रभागांमध्ये सर्वच्या सर्व नगरसेवक विजय करण्यासाठी सातव्या माळेला मोठ्या प्रवेशाची शक्यता निर्माण झाली आहे. मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वडगाव शेरी खडकवासला आणि हडपसर भागातील ताकद लक्षात घेऊन या मतदारसंघांसह कोथरूड मधील काही मोठ्या लोकांच्या प्रवेशाच्या चर्चा सर्वत्र रंगू लागल्या आहेत. आपल्या ‘मुलांची राजकीय भविष्य सुकर व्हावं’ यासाठी सर्वांनी भाजपची दारे ठोठावण्यास सुरुवात केली आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

महापालिका निवडणुका महायुतीसोबत लढायच्या की स्वतंत्रपणे, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; परंतु भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार सत्यता असतानाही नगरसेवकांनी केलेली कामगिरी फारशी समाधानकारक नसल्याचे चित्र पक्ष पातळीवर सर्वांनाच ज्ञात आहे. महापालिकेत सत्ता असतानाही काम न केलेल्या सभासदांना जर घरी बसवायचे ठरले तर पर्यायी सक्षम बाहुबली चेहरे पक्षाकडे उपलब्ध असावेत यासाठी शहरात संघटन मजबूत असतानाही स्वबळासाठी नव्या प्रवेशांचा शुभारंभ होण्याची शक्यता वाढली असून पारंपारिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे बालेकिल्ले असलेल्या प्रभागांमध्ये 2 आकडी इच्छुकांची संख्या असतानाही नवे चेहरे प्रवेश करत असल्याने अन काही लोकांनी विधानसभा लोकसभेच्या दरम्यानच प्रवेश केल्याने मूळचा कार्यकर्ता मात्र अस्वस्थ असून आज तरी सत्तेची गणितं त्यांच्या पत्नी पडत नाहीत.

पुणे शहरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे जोरदार वाहत आहे. सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये खूप मोठी अडचण म्हणजे सत्तेची पदे उपभोगत असलेल्या मंत्री आणि खासदार यांनी आपापली समर्थक लॉबी तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पर्वती कोथरूड या प्रमुख मतदारसंघांसह उर्वरित मतदारसंघांमध्ये बार्गेनिंग पॉवर वाढवण्याच्या हेतूने बिग शॉट चेहरे पक्षात समाविष्ट करण्यासाठी नेत्यांनी चंगच बांधला आहे. त्यातच नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा जर जिंकत भारतीय जनता पक्षाने विक्रमी यश मिळवल्याने विरोधात असलेले काही निवडक बाहुबली नेतेसुद्धा आपली स्थानिक ताकद वापरून काही पदरात पाडून घेऊन अनेक जण पक्षांतर करत असल्याचं पाहायला मिळत आहे. एखादं पद, आगामी निवडणुका तिकिटांचे हमी तसंच विकास कामांसाठी निधी मिळण्याबाबतचे आश्वासन घेऊन अनेक महाविकास आघाडीतील नेते सत्ताधाऱ्यांकडे जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

पुणे महापालिकेची प्रभाग रचना जाहीर झाल्यापासून भारतीय जनता पक्षाने प्रत्येक प्रभागाचे सूक्ष्म निरीक्षण केले असून सध्या स्थितीत कार्य करण्याची असलेली परिस्थिती लक्षात घेऊन पुणे शहरामध्ये दसऱ्यापूर्वी भाजपमध्ये मोठे नेते प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पुणे शहरातील प्रभाग रचना पक्षास अनुकूल झाली असे वरिष्ठ पातळीवर वाटत असले तरीसुद्धा सूक्ष्म नियोजनामध्ये प्रभागातील उणीवा सूक्ष्मपणे जाणवत आहेत. विरोधातील बाहुबली चेहरे अन सत्ता असतानाही निष्क्रिय असलेले सभासद यामुळे भारतीय जनता पक्षाकडे नव्या लोकांना प्रवेश देण्याशिवाय पर्याय राहीला नाही काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाची ही अडचण लक्षात घेऊन या भाऊबली चेहऱ्यांकडून सुद्धा जर त्यांच्या जवळच्या पदाधिकाऱ्यांना भाजपने उमेदवारी दिली तरच या अटीवर प्रवेश करणार सांगितलं जात आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

पुणे शहरातील असंख्य नगरसेवकांची महायुतीतील वरिष्ठ नेत्यांसोबतची जवळी लपलेली नाही. भारतीय जनता पक्षाने प्रभाग रचनेमध्ये केलेल्या प्रचंड फेरबदलामुळे समाविष्ट गावांसह असंख्य जुन्या प्रभागातील चेहरे भाजपवासी नवल वाटणार नाही. पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठे चेहरे भाजपवासी करण्याचे नियोजन सुद्धा केले आहे परंतु मराठवाड्यातील अतिदुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या मध्ये बदल होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.

 “प्रत्येक प्रभागात पाच ते सात इच्छुक उमेदवार आहेत. मात्र, तिकीट वाटप हे केवळ वरिष्ठ पातळीवरच्या चर्चेनंतरच होणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक कामगिरीला प्राधान्य दिले जाणार आहे. भाजपने आतापर्यंत अनेक वेळा सर्वेक्षण केले असून, त्यानुसार पक्षाला पुणे महापालिकेत पुन्हा बहुमत मिळेल”, असा दावा केला जात असतानाच विरोधी पक्ष आणि युतीतील काही कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे महापालिका निवडणुका दिवाळीनंतरचं होण्याची दाट शक्यता असल्याने, प्रवेशाबाबत वरिष्ठ पातळीवर विचार करून कदाचित काही दिवसानंतरचा निर्णय घेतला जाईल.

भारतीय जनता पक्षाची पुणे शहरातील वाटचाल

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २००७

  • भारतीय जनता पार्टी – २५ विजयी नगरसेवक

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- २०१२

  • भारतीय जनता पार्टी – २६ विजयी नगरसेवक

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- २०१७

  • भारतीय जनता पार्टी – ९७ विजयी नगरसेवक