उजनीत 109 टक्के पाणी साठा; नदीपात्रात १ लाखाहून अधिक क्युसेक्स विसर्ग प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

0

पुणे शहरासह घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच उजनी धरणाने यापूर्वीच शंभरी पार करीत धोकादायक पातळी गाठत आल्याने धरणातून भीमा नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गात वाढ करीत सोमवार (ता.15) रोजी सकाळी 1 लाखाहून क्युसेक्स करण्यात आला.यामुळे नदीला पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली असून नदी काठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देणेबाबत आला.

पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणात सोमवार सकाळी 6 वाजता 109.79 टक्के पेक्षा जास्त पाणी साठा झालेला आहे. तसेच रविवारी रात्री अनेक भागात मुसळधार पाऊस झाला त्याबरोबरच सध्या पुणे जिल्हा व घाट माथा भागासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे तसेच उजनी धरणाच्या ऊर्ध्व भागातील धरणांमधून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळी मध्ये सातत्याने वाढ होत आहे. तसेच दौंड येथील सरीता मापन केंद्र या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असून त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

त्यानुषंगाने खबरदारी म्हणून उजनी धरणाचे पुरनियंत्रणासठी पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान व येणारी पाण्याची आवक लक्षात घेता पुरनियंत्रणासाठी रविवारी रात्री पासून उजनी धरणाच्या सांडव्यावरुन भीमा नदीमध्ये पूर नियंत्रणासाठी पहिल्या टप्प्यात 25 हजार क्यूसेक्स त्यानंतर 60 हजार क्युसेक्स, 75 हजार क्युसेक्स तर सोमवारी सकाळी अधिक वाढ करीत 1 लाख क्यूसेक्स करण्यात आला. यामुळे नदीतील एकूण विसर्ग सांडव्यातून 1 लाख क्यूसेक्स व विदयुत गृह 1600 क्यूसेक्स असा एकूण 1 लाख 1 हजार 600 क्यूसेक्स विसर्ग भीमा नदीमध्ये सोडण्यात येत आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवक नुसार विसर्ग कमी जास्त होण्याची शक्यता आहे.यामुळे नदी काठांवरील गावांना व नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

उजनी धरणातील सोमवार (ता.15) रोजी सकाळी 6 वाजताची पाणीपातळी

एकूण पाणीपातळी – 3468.57 दशलक्ष घनमीटर (122.48 टी एम सी)

उपयुक्त साठा _ 1665.76 दशलक्ष घनमीटर (58.82 टी एम सी)

टक्केवारी 109.79 टक्के

उजनी धरणात होत असलेली पाण्याची आवक – 6576 क्युसेक्स

उजनीतून विसर्ग

मुख्य दरवाजातून – 1 लाख क्युसेक्स

वीजनिर्मिती – 1600 क्युसेक

सीना माढा बोगदा – 180 क्युसेक

मुख्य कालवा – 600 क्यूसेक्स

मोठा बोगदा – 200 क्युसेक्स

महत्त्वाची सूचना

सद्यस्थितीत उजनी धरण स्थानिक पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस झाल्याने व पाण्याची आवक वाढलेने उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सुरू असलेला विसर्ग वाढवून 1 लाख क्यूसेक्स एवढा विसर्ग करण्यात आला आहे.सदर विसर्गा मध्ये आवश्यकते नुसार वाढ होण्याची शक्यता आहे.यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत तसेच योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

स. शि. मुन्नोळी कार्यकारी अभियंता

उजनी धरण व्यवस्थापन विभाग भीमानगर.सोलापूर