ठरलं! ठाकरेंच्या युतीचा नारळ शिवाजी पार्कातच फोडणार, दसरा मेळाव्याबाबत समोर आली मोठी अपडेट

0

मुंबई : शिवसेनेच्या फुटीनंतर खरी शिवसेना कोणती, या वादापासून ते ऐतिहासिक छत्रपती शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार, याचा वाद शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात सुरू आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी काही दिवस शिल्लक असताना छत्रपती शिवाजी पार्क मैदान कोणाला मिळणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दसरा मेळाव्यासंदर्भातील महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेना उद्धव बााळासाहेब ठाकरे पक्षाला परवानगी मिळाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार का याची उत्सुकता कायम असताना आता मैदानाबाबतची अपडेट समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून जानेवारी 2025 मध्ये दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या परवानगीसाठी अर्ज करण्यात आला आहे. अखेर नऊ महिन्यांनी शिवसेना उद्धव ठाकेर गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन