भारत कॉलनी शिवराज मित्र मंडळ आदर्श गणेशोत्सव मंडळ; चंदनापासून बनवलेली गणेश मूर्ती आणि ही आहे मोठी प्रथा

0

कर्वेनगर येथील भारत कॉलनीतील शिवराज मित्र मंडळाच्या वतीने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष श्री माणिक शेठ दुधाने व व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष माननीय श्री आनंद उर्फ बंडूशेठ तांबे यांना विशेष असं आरतीसाठी निमंत्रण देण्यात आलं होत, आजच्या या धकाधकीच्या चमकोगिरीच्या युगात मंडळाचे उपक्रम ऐकून खूप चकित करणारे आहेत, कारण आजच्या युगात काही गणेश मंडळ धांगडधिंगा मोठे डीजे लावून त्याच्यापुढे नाचण्यात धन्यता मानतात. परंतु शिवराज मित्र मंडळाने अतिशय आदर्श पणे छत्तीसाव्या वर्षात पदार्पण केलेलं असून बाप्पाची विसर्जन मिरवणूक ढोल लेझीम ताशाच्या गजरात व पालखीमध्ये काढण्यात येते हे वैशिष्ट्यपूर्ण असून दररोज एका महिला भगिनीस लकी ड्रॉ द्वारे एक साडी सप्रेम भेट देण्यात येते.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

मंडळाच्या आरतीसाठी सहकुटुंब उपस्थित राहण्याची प्रथा अतिशय आगळी वेगळी आणि मनाला भावणारी आहे. लहान मुलांसाठी रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, किल्ला बनवणे, गणेश मूर्ती बनवणे, कुस्तीचे प्रशिक्षण देणे, विविध खेळातील नाविन्यपूर्ण असे खेळाडू घडविणे त्याचप्रमाणे पर्यावरण पूरक अशी चंदनाच्या लाकडापासून बनवलेली गणेश मूर्ती सुद्धा या मंडळांनी बसवलेली आहे. अशा प्रकारचे विविध कार्यक्रम मंडळाच्या वतीने राबविले जातात त्याचप्रमाणे या मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात महिलांचा, लहान मुलांचा खूप मोठा सहभाग असतो हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. अतिशय आदर्श असे हे शिवराज मित्र मंडळ असून मंडळाचे संस्थापक पैलवान वस्ताद संदीप वांजळे त्याचप्रमाणे अध्यक्ष निलेश फाटक चैतन्य मोकर, किरण वांजळे, अझर मुलाणी, राजाभाऊ नालगुडे, प्रशांत पेद्दी, राहुल फाटक, उमेश जऊळ, सुनील वांजळे व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे माणिक शेठ दुधाने व आनंद तांबे यांच्या वतीने विशेष असे अभिनंदन करण्यात आले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा