राहुल गांधींना महाराष्ट्र निवडणूक आयोगाने पाठवलं पत्र अन् म्हटलं… आयोगाच्या माहितीची पुन्हा माहिती मागवली

0
30

बिहारमधील मतदार यादी पूनसर्वेक्षणावरून निवडणूक आयोगाला लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरूवारी पुन्हा एकदा लक्ष्य केलं तसेच यावेळी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोळ झाल्याचाही पुन्हा एकदा आरोप केला आहे. एवढंच नाहीतर अनेक निवडणुकीत एका व्यक्तीने तीन वेळा मतदान केल्याचंही त्यांनी म्हटलं. लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्र निवडणूक आयोगाने त्यांना प्रत्युत्तर दिलं असून आरोप करत असलेल्या तथ्याची सविस्तर माहिती देण्याची मागणी लेखी पत्राद्वारे केली आहे.

राहुल गांधींच्या या आरोपानंतर महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालया मार्फत खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहून मतदार नोंदणी नियम, १९६० च्या नियम २०(३)(ब) अंतर्गत संबंधित मतदारांच्या नावांसह स्वाक्षरी केलेले घोषणापत्र आणि शपथपत्र सादर करण्याची विनंती केली आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. पत्रात असे म्हटले आहे की, “आज झालेल्या पत्रकार परिषदेत तुम्ही अपात्र मतदारांचा समावेश आणि पात्र मतदारांना मतदार यादीतून वगळण्याबद्दल उल्लेख केल्याचे कळले आहे. अशा मतदारांच्या नावांसह संलग्न घोषणापत्र/प्रतिज्ञापत्र स्वाक्षरी केल्यानंतर परत पाठवावे, जेणेकरून आवश्यक कार्यवाही सुरू करता येईल.”

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

संविधानाची खरी ताकद म्हणजे मतदान आहे. पण निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धीनंतर योग्य व्यक्ती मतदान करते आहे का? अनेक मतदार यादीत बनावट मतदारांचा समावेश करण्यात आला का? असा प्रश्नही राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.