कोथरूड गावठाण व परिसरातील नागरिकांसाठी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने हक्काच्या सेवेसाठी सरकार तुमच्या दारी..! अभिनव उपक्रमाची कोथरूड छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ दिनांक ४ ते ६ ऑगस्ट या काळात पार पडलेल्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम हा लोकाभिमुखतेचा, पारदर्शक सेवेचा आणि सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाला समस्त कोथरूडवासीयांचा उत्साही प्रतिसाद मिळाला. भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस दुष्यंत मोहोळ भारतीय यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
शासन आपल्या दारी या उपक्रमात शासनाची विविध सेवा थेट नागरिकांच्या परिसरात पोहोचवण्यात आयोजकांना यश आले. जिथे सेवा मिळवण्यासाठी कुठलीही धावपळ, अडचण किंवा विलंब न होता सहज, सुलभ आणि तत्काळ सेवा देण्यावर भर असल्यामुळे उत्साही प्रतिसादामध्ये नागरिकांना याचा लाभ घेता आला. सलग तीन दिवस सुरू असलेल्या या उपक्रमामध्ये उत्पन्न दाखले – १७८, रहिवासी दाखले – ७, डोमसाईल दाखले – २७, ईडब्ल्यूएस व नॉन क्रिमीलेअर दाखले – २, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र – ११२, शपथपत्र / अॅफिडेव्हिट – ७, रेशनकार्ड सेवा – १४६ नागरिक, आधारकार्ड सेवा – ३८० नागरिक, समाजकल्याण योजनांतर्गत सेवा – ५१२ लाभार्थी, HSRP नंबर प्लेट नोंदणी – ४२७ नागरिकांना विभिन्न सेवा घेता आल्या. या उपक्रमात आधारकार्ड आणि रेशनकार्डशी संबंधित अडचणींचे तातडीने निराकरण करण्यात आले, यामुळे नागरिकांनी आयोजक भारतीय युवा मोर्चा सरचिटणीस दुष्यंत मोहोळ यांच्या विषयी समाधान आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
कोथरूड गावठाण परिसरामध्ये ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमामुळे फक्त सेवा पोहोचली नाही तर शासनाच्या कामकाजाबद्दलचा विश्वासही नागरिकांच्या मनात रुजला.
या उपक्रमातून नागरिकांना सेवा मिळवण्यासाठीची अडथळ्यांची साखळी संपली आणि सुलभतेचा नवा अनुभव मिळाला. या तीन दिवसांत कोथरूडमधील हजारो नागरिकांनी या उपक्रमास दिलेला भरघोस प्रतिसाद हा केवळ विश्वास नव्हता, तर आमच्यावर सोपवलेली जबाबदारी होती आणि ती जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडली याचा अभिमान आहे! कोथरूडकरांनी दिलेला पाठिंबा हीच आमची प्रेरणा असून आमची भूमिका – जनतेसाठी, सेवेसाठी पुढेही निरंतर आणि समर्पित पद्धतीने पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे असे माध्यमांशी बोलताना दुष्यंत मोहोळ यांनी सांगितले.