पुण्यातील कंत्राटदार झारखंड दारू घोटाळ्यात अटक; 108च्या ॲम्बुलन्सचेही कंत्राट; श्रीकांत शिंदेंशी असा संबंध

0
24

झारखंडमधील बहुचर्चित दारू घोटाळा प्रकरणात आणखी एक मोठी अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी संध्याकाळी सुमित फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अमित प्रभाकर सांळुखेला अटक केली. अमित हा पुण्यातील सुदर्शननगर येथील रहिवासी आहे. एसीबीने यापूर्वी चौकशीसाठी नोटीस बजावली होती आणि बुधवारी रांची येथील मुख्यालयात बोलावण्यात आले होते, जिथे सुमारे चार तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. तपासादरम्यान अमितच्या घोटाळ्यात सहभागाशी संबंधित अनेक महत्त्वाचे पुरावे एसीबीला सापडले आहेत. एजन्सीच्या मते, घोटाळ्यातील नामांकित आणि अनामिक आरोपींशी त्याचे आर्थिक संगनमत होते. दारूशी संबंधित बेकायदेशीर पैशांच्या व्यवहारात आणि वितरणात अमितची भूमिका आढळून आली आहे.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

सर्व पैसा श्रीकांत शिंदे फौंडेशनला वळवला

दरम्यान, अमित साळुंखेच्या अटकेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्याचा श्रीकांत शिंदे फौंडेशनशी संबंध असल्याचे म्हटले आहे. त्याने घोटाळ्यातील सर्व पैसा श्रीकांत शिंदे फौंडेशनला वळवला असून 800 कोटींचा घोटाळा असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करून याच व्यक्तीकडे 108 नंबर अॅम्बुलन्सचे कंत्राट असल्याचे म्हटले आहे.

कमी सर्व्हिस चार्ज भरून कामे घ्यायची आणि असे घोटाळे करायचे

आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, झारखंडमधील दारू घोटाळ्याप्रकरणी पुण्यातील कंत्राटदाराला अटक करण्यात आली आहे. सुमित फॅसिलिटी कंपनीचा संचालक अमित साळुंखेला झारखंड एसीबीकडून अटक करणयात आली आहे. महाराष्ट्रात सुमित फॅसिलिटी कंपनीला 108 नंबरच्या अॅम्बूलन्स चालवण्याचे कंत्राट देण्यात आलंय. झारखंडमध्ये सध्या दारू घोटाळा गाजत असून या घोटाळा प्रकरणात पुणेस्थित सुमित फॅसिलिटी कंपनीच्या संचालकाला अटक झाल्याने या घोटाळ्याची व्याप्ती वाढत चाललीय. झारखंडमध्ये सुमित फॅसिलिटी कंपनीला मनुष्यबळ पुरवठ्याचे काम मिळाले होते. आतापर्यंत या घोटाळा प्रकरणी 11 जणांना अटक करण्यात आलीय.निविदा भरताना कमी सर्व्हिस चार्ज भरून कामे घ्यायची आणि असे घोटाळे करायचे, ही या कंपनीची मोडस ॲापरेंडी असल्याची माहिती मिळतंय. राज्यात १०८ नंबरचे ॲम्बूलन्स चालवण्याचे काम सुमित फॅसिलिटीला देतानाही बराच वाद झाला होता आणि विरोधकांनी आरोपही केले होते.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

दुसरीकडे, तपासात सहकार्य न केल्याबद्दल एसीबीने अमितला 15 जुलै रोजी पुन्हा नोटीस पाठवली आणि 23 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले. या काळात अमितने एसीबीला दोन कागदपत्रेही दिली, ज्याचा अभ्यास केल्यानंतर घोटाळ्यातील त्याची भूमिका अधिक स्पष्ट झाली. चौकशीदरम्यान देण्यात आलेल्या कागदपत्रांवरून असे दिसून आले की सध्या तुरुंगात असलेला आरोपी सिद्धार्थ सिंघानिया हा एकेकाळी सुमित फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये संचालक आणि सल्लागार म्हणून काम करत होता.