“शासनाची सवलत, टॅक्स नाही तरीही ते…”; दीनानाथ रुग्णालय प्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्र्या ची ही प्रतिक्रिया

0
1

धर्मादाय आयुक्त अंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांना शासनाची सवलत आहे. त्यांना कोणताही टॅक्स नाही, असं असताना देखील ते गरिबांची सेवा करत नाहीत म्हणून अशा पद्धतीचा रोष या रुग्णालयांविरोधात वाढत आहेत, असं म्हणत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणावर भाष्य केलं आहे. मंत्री मुश्रीफ म्हणाले, या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना देखील लागू करत नाहीत. माझी विनंती आहे की, त्यांनी महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना लागू करून घ्यावी. जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत. मीच समिती नेमणार मीच चौकशी करणार तर दोषी कसं होणार?

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

अशा शब्दात हॉस्पिटलच्या समितीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त करत संशय व्यक्त केला. त्या महिलेला दाखल करून उपचार केले असते तर काय झालं असतं? त्यांनी माणुसकीच्या भूमिकेतून बघणं आवश्यक आहे. मुंबईतल्या कोणत्याही दवाखान्यामध्ये आयुष्यमान भारत जीवनदायी योजना नाही, असंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया मी ऐकली नाही. मात्र अजितदादा याबाबत बोलले आहेत. सध्याची आर्थिक परिस्थिती बघता आता कर्जमाफी शक्य नाही. पण त्यांनी कधीट कर्जमाफी करणार नाही असं म्हटलं नाही. आर्थिक परिस्थिती वर्ष दोन वर्षांमध्ये आमची नक्की सुधारणार, सगळ्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण होणार असल्याचा विश्वास यावेळी मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि आणि मंत्री उदय सामंत यांच्या भेटीवर मुश्रीफ म्हणाले, राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देणार असतील तर चांगलंच आहे. तसंच यावेळी शक्तिपीठ महामार्गाबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. शक्तिपीठ महामार्गाबद्दल एकनाथ शिंदेंनी अधिसूचना रद्द केली होती.

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्हाला शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे. पण लादायचा नाही त्यामुळे शेतकऱ्यांची संमती घेऊनच शासन शक्तीपीठ महामार्ग करेल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान, राजू शेट्टी अजित पवारांच्या बाबत धादांत खोटे बोलत आहेत.

मी देखील त्या गाडीमध्ये होतो. अजितदादांनी केवळ विचारलं ही गाडी कुणाची ही गाडी पालकमंत्र्यांची असेल तर त्यांना कोणती गाडी दिली. चुकीचं वक्तव्य करून गैरसमज तयार करणे हे काही बरोबर नाही. या शब्दात राजू शेट्टी यांना मुश्रीफ यांनी सुनावलं.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे