भाजपचा मनपा फॉर्म्युला ठरला रणशिंग फुंकलं?!; आमदारांची ही यादी मुख्यमंत्री कार्यालयात जमा होण्यास सुरुवात

0

महाराष्ट्रात होणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आता नवा फॉर्म्युला ठरला आहे. राज्यातील सध्या बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन एन केल प्रकारे महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली असून स्थानिक पातळीवरती भारतीय जनता पक्षाची आता कायम राखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी त्या भागातील आमदारांवर देण्यात आली असून त्यासाठी प्रत्येक आमदाराची पाच कामं केली जाणार आहेत. महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजपने ही रणनीती आखली आहे. तर मुंबईत महायुतीचाच महापौर असेल असा निर्धार करायचा आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

महाराष्ट्रात सुरू होणाऱ्या मनपा निवडणुकीत फायदा होईल अशी कामं आमदारांनी सुचवावी असे आदेश देण्यात आल्यानंतर आता आमदारांकडून कामांची यादी मुख्यमंत्री कार्यालयात देण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर निवडणुकीत काय रणनीती असावी याबाबत आमदारांची मतं देखील जाणून घेण्यात आलेली आहे. राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष स्वतंत्र निवडणुकीला सामोरे जाणार अशी वल्गना करत असतानाच राज्यात सध्या सत्तेत असलेल्या महायुतीच्या सर्व मित्र पक्षांसह एकत्र निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय प्रदेश पातळीवर घेण्यात आला आहे. मुंबईसह राज्यात सर्वत्र महायुती म्हणून लढायचं आहे, असे आदेशच मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. तसंच माध्यमांशी जास्त बोलू नका अशी ताकीद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा