कृषी मंत्री माणिकराव कोकाटे संतापले; मी कोणाचा विनयभंग केला की चोऱ्यामाऱ्या? राजीनामा देण्यासारखं घडलं काय

0
1

सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ असो किंवा शेतकऱ्यांबद्दलची आक्षेपार्ह विधाने.. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना चर्चेत कसं रहायचं ते नीट समजतं. काही दिवसांपूर्वीच कोकाटे यांचा सभागृहात रमी ( पत्ते) खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी तो व्हिडीओ ट्विट केल्यावर प्रचंड खळबळ माजली, विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला, राज्यातील वातावरण पेटल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही हे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही कोकाटेंना समज द्यावी लागली. मात्र एवढं सगळ होऊनही आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे यांच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप किंवा चिंता दिसत नव्हती.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

रमी खेळण्याच्या मुद्यावरून विरोधकांकाडून कोकाटेंच्या राजनाम्याची मागणी होत असताना ते मात्र निवांतपणे बसून आपल्या कृत्यांचं स्पष्टीकरण देत तो मी नव्हेच, मी ते केलंच नाही असा राग आळवत होते. हा इतका छोटा विषय आहे. हा विषय लांबला का कळलं नाही. ऑनलाईन रमी सुरू झाल्यापासून आजपर्यंत मी रमी खेळलो नाही. मला रमी खेळताच येत नाही असा दावा कोकाटेंनी केला.

राजीनामा देण्यासारखं घडलं काय ?

एवढंच नव्हे तर राजीनामा देण्यासारखं घडलं काय. मी काही विनयभंग केला आहे. चोरी केली आहे. माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची नाही. मी केलं काय ? असा सवालही विचारत कोकाटेंनी थेट हात वर केले.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

ज्या विरोधकाने जो व्हिडीओ काढला त्याला मी कोर्टात खेचणारच आहे. साधा पाय घसरला तरी त्याची चर्चा होते. प्रतिक्रिया सुरू होतात. दारू प्याला असेल, गांजा प्यायला असेल अशा काहीही सोशल मीडियात प्रतिक्रिया येतात.

मला रमी खेळताच येत नाही

ऑनलाइन रमी खेळताना मोबाईल नंबर अटॅच पाहिजे. बँकेचं अकाऊंट अटॅच पाहिजे. अशा प्रकारचं कोणताही मोबाईल नंबर आणि अकाऊंट माझं अटॅच नाही. माझे बँकेचे अकाऊंट देणार आहे. कुठेही चौकशी करा. ऑनलाईन रमी सुरू झाल्यापासून आजपर्यंत एक रुपयाची रमी खेळलो नाही. मला रमी खेळता येत नाही. हा आरोप चुकीचा आणि बिनबुडाचा आहे. अँड्राईड मोबाईल आहे , 5जी आहे. काही टच झालं तर भलतंच काही तरी दिसतं. स्किप करेपर्यंत माझा दहा पंधरा सेकंदाचा वेळ गेला असेल अशी सारवासारव करण्याचा प्रयत्नही कोकाटे यांनी केला. तसेच ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आणि माझी बदनामी केली. त्यांना मी कोर्टात खेचणार असा इशारा कोकाटे यांनी दिला.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना पत्र देणार आहे. चौकशी करण्याची मागणी करणार आहे. मी दोषी आढळलो तर नागपूरच्या अधिवेशनात मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालांना राजीनामा देईनअसेही ते म्हणाले.