मुंबई दि. १८ (अधिराज्य) महाराष्ट्रातील तमाम स्वयंसेवी संस्थांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणारी “महाराष्ट्र एनजीओ समिती” म्हणजे महाराष्ट्रातील विविध सामाजिक क्षेत्रातील व अक्षरशः मोडकळीस आलेल्या सामाजिक संस्थाची आधारवड संस्था; राज्यातील मोडकळीस आलेल्या व कागदपत्रांची पूर्तता नसलेल्या स्वयंसेवी संस्थाना मार्गदर्शन करणे, प्रशिक्षण देणे, ऑनलाइन कार्यप्रणालीची, आवश्यक सर्टिफिकेटची माहिती देणे, त्यांना सक्षम करणे अशी अनेक कामे महाराष्ट्र एनजीओ समितीच्या वतीने करण्यात येतात.
संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे हे संकल्प संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षे मुंबईतील चेंबूर, गोवंडी, शिवाजी नगर आणि मानखुर्द यांसारख्या विभागात वस्ती विकास प्रकल्प, शैक्षणिक, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि वस्ती संघटन यांसारख्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत त्यांच्या याच कार्याची नोंद घेत महाराष्ट्र एनजीओ समितीच्या मुंबई उपनगर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे, सदर प्रसंगी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. युवराज येडूरे, उपाध्यक्षा डॉ. सुनिताताई मोडक, संचित यादव, मंगेश सावंत, अश्विनी कसबे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विनोद हिवाळे यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.