समता प्रतिष्ठाणच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती व ९ व्या वर्धापन दिनानिमित्त शालेय साहित्याचे वाटप

0

समता प्रतिष्ठान मंगळवार पेठ पुणे अंतर्गत आंगण अभ्यासिका यांचा नववा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व बॅग भेट देण्यात येते. यासाठी सेवा सहयोग संस्थेचे यांचे मोलाचे सहकार्य लाभते. १०० मुलांकरीता शालेय साहित्‍य असलेलं किट त्‍यांनी उपलब्ध करून दिले. आज या कार्यक्रमाला श्री. नंदकिशोर जगताप, निवृत्त सल्लागार कामगार अधिकारी तसेच श्री. तेजस अर्लिकट्‌टी, सी.ए.आणि कॉ. मधुकर नरसिंगे कार्याध्यक्ष, व कॉ. वैजीनाथ गायकवाड, जॉईन्ट सेक्रेटरी, पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच समता प्रतिष्ठानचे संस्थापक श्री संदीप मोरे, अध्यक्ष सौ. अपर्णा चव्हाण, विश्वस्त मंडळातील पदाधिकारी सौ. अमृता मोरे, खजिनदार शुभम वेळेकर व अन्य सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. जगताप सर यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, “समता प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेले हे शैक्षणिक उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. समाजातील दुर्लक्षित व वंचित घटकासाठी शिक्षण देण्याचे काम करून अत्‍यंत चांगला असा आदर्श निर्माण करत आहे.
तद्नंतर श्री तेजस सर यांनी यशस्वी होण्यासाठी शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे मुलांना समजावून सांगितले. सी.ए., सी.एस. सारख्या अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शन करताना अनेक प्रकारचे विद्यार्थी भेटतात, त्‍यांची परिस्थिती पाहून त्‍यांना जास्तीत जास्त प्रोत्‍साहन देण्याचे काम करत असल्याचे सांगितले. येरवडा परिसरात राहत असूनही अत्‍यंत कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन सि.ए. झाल्याचे त्‍यांनी मुलांना सांगितले. कॉन्स्टॅबल रूपाली गिते यांनीही मुलांना साहित्‍य वाटप करून शिक्षणासाठी प्रोत्‍साहित केले. समता प्रतिष्ठान करीत असलेल्या कामासाठी शक्य ते सहकार्य करण्याचे आवाहन त्‍यांनी केले.
कॉ. वैजीनाथ गायकवाड यांनी सुद्धा बोलताना समता प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या बाबासाहेबांनी सांगितलेल्या त्रिसूत्रीचा आपल्या जीवनामध्ये नक्की समावेश करा हे सांगितले. मार्गदर्शन केल्यानंतर सर्व उपस्थीत मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमांमध्ये मुलांनी आपापले कलागुण सादर केले. देशभक्तीपर गितांवर आधारित नृत्‍य, गाणी, समूह गान, छत्रपती शाहू महाराज यांची माहिती मुलांनी सांगितली. तसेच विविध नृत्य सादर करून मुलांनी पालकांची मने जिंकली. अध्यक्षा अपर्णा चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे शेवटी आभार मानले. या सगळ्या कार्यक्रमासाठी मदत करणारे, संम्यक चव्हाण, तनिष्क उबाळे, राज कदम, सोहम सोनवणे, अवधूत, सानिका सरोज, श्रेया मोरे, आदिती साठे, श्रावणी धाराशिवकर, सानिका चव्हाण, श्रावणी शिरोळे, विठ्‌ठल शिंदे आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी पाटोळे या अभ्यास प्रमुख या कार्यकर्तीने केले. शेवटी छोटया मुलांनी प्रार्थना घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा