रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांची लग्नाची तारीख पुढे ढकलली, जाणून घ्या कारण

0
10

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या जौनपूर (मच्छलीशहर) लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या युवा खासदार प्रिया सरोज यांचा विवाह लवकरच होणार होता. दोन्ही कुटुंबीयांकडून लग्नाची तयारी जोरात सुरू होती. मात्र आता ही लग्न सोहळा काही काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.

या महिन्यातच दोघांची सगाई लखनऊतील एका हॉटेलमध्ये पार पडली होती. येत्या 18 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांचा विवाह वाराणसीतील ताज हॉटेलमध्ये होणार होता. पण आता रिंकू सिंहच्या क्रिकेटच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये रिंकू सिंह काही महत्वाच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होणार असल्यामुळे तो उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांनी विवाह समारंभाची तयारी थांबवली आहे. हॉटेल बुकिंग आता 2026 च्या फेब्रुवारी अखेरीस हलवण्यात आले आहे. मात्र, नवीन तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

सध्या सोशल मीडियावर रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांच्या साखरपुड्यातील भावनिक क्षणांचे व्हिडिओ आणि फोटोही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. साखरपुड्याच्या कार्यक्रमात राजकारण आणि खेळविश्वातील अनेक दिग्गज उपस्थित होते. प्रिया सरोजच्या डोळ्यांत आलेले अश्रू आणि दोघांचा मनमोहक अंदाज पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला होता.