रईसांची पसंती मर्सिडीजला; BMW, Jaguarला टाकले मागे

0

भारतात लक्झरी कार्सची मागणी कायम असून, 2025 या आर्थिक वर्षात सर्वाधिक पसंती मर्सिडीज-बेंझला मिळाल्याचे समोर आले आहे. या कालावधीत एकूण 48,849 लक्झरी कार्सची विक्री झाली असून, 2024 च्या तुलनेत ही वाढ 0.55 टक्क्यांनी झाली आहे.

मर्सिडीज-बेंझने 18,928 युनिट्स विकून पहिल्या क्रमांकावर कब्जा केला आहे. BMW ने 15,995 युनिट्स विकून दुसरा क्रमांक पटकावला. जग्वार लँड रोव्हरने 6,183 युनिट्स विक्रीसह तिसरा क्रमांक मिळवला असून, त्यात तब्बल 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑडीने 5,993 युनिट्स विकल्या असून 15 टक्के घट झाली आहे. वोल्वो इंडियाची विक्री 1,750 युनिट्सवर आली असून, 18.60 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे.

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?

एकूणच, मर्सिडीजने पुन्हा एकदा आपली आघाडी सिद्ध केली असून, वाढीच्या बाबतीत JLR सर्वांना मागे टाकत पुढे सरसावली आहे.