आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचे तिघे जेरबंद; IT प्रोफेशनलची 1.55 कोटींची फसवणूक

0

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून एक IT प्रोफेशनलची तब्बल ₹1.55 कोटींची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीतील तिघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली आहे.

अटकेतील आरोपींची नावे शुभम चंद्रकांत म्हनता (२५), स्वप्नील चंदूलाल बहेटी (३५) – पत्रकार असल्याचा दावा, प्रशिक उत्तम नवघरे (२६) – वकील असल्याचा दावा अशी असून हे तिघेही सोलापूरचे रहिवासी आहेत.

मार्च २०२५ मध्ये एक शेअर मार्केट फसवणूक प्रकरण नोंदवले गेले होते, ज्यामध्ये एका IT क्षेत्रातील व्यावसायिकाला उच्च परताव्याचे आमिष दाखवून ₹1.55 कोटींची फसवणूक करण्यात आली.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

पोलिस तपासात उघड झाले की, बहेटी आणि म्हनता हे चीनमधील सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात होते. शुभम म्हनता एका चायनीज कंपनीसाठी काम करत होता आणि OTP फॉरवर्ड करून सायबर फसवणुकीत मदत करत होता. नेपाळमार्गे पलायन करण्याचा प्रयत्न करताना प्रशिक व म्हनता यांना पुणे विमानतळावर अटक करण्यात आली.

फसवणुकीची रक्कम सोलापूरच्या अमित अशोक एकबोटे यांच्या खात्यावर जमा झाली होती. एकबोटेने पोलिसांना सांगितले की, गेमिंगसाठी या आरोपींनी त्याच्याकडून बँक तपशील घेतले होते.

प्रविण स्वामी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सायबर सेल यांनी सांगितले की “आरोपींनी पत्रकार आणि वकील असल्याचा दावा केला आहे. त्याची सखोल तपासणी सुरू आहे. गेल्या पाच दिवसांत पिंपरी-चिंचवड सायबर सेलने सिलवासा, दादरा नगर हवेली, सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर व पुणे येथे छापे टाकून ३ प्रकरणांमध्ये एकूण ११ आरोपींना अटक केली आहे, ज्यात एकूण ₹२.११ कोटींची फसवणूक झाली होती.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती