सोलापूरजवळील लांबोटी येथे ‘टीपू पठाण’ गँगचा सदस्य पोलिस एन्काऊंटरमध्ये ठार

0

पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे सोलापूरजवळील लांबोटी गावात एका मोठ्या कारवाईत ‘टीपू पठाण टोळी’चा कुख्यात गुन्हेगार शाहरुख ऊर्फ अट्टू रहिम शेख (२३) याला एन्काऊंटरमध्ये ठार केले. तो गेल्या अनेक गंभीर गुन्ह्यांप्रकरणी फरार होता आणि मकोका (MCOCA) अंतर्गतही त्याच्यावर गुन्हा दाखल होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, पुणे गुन्हे शाखेचे युनिट ५ आणि ६ व मोहोल पोलीस ठाण्याचे अधिकारी मिळून सकाळी साडेतीनच्या सुमारास लांबोटी गावात पोहोचले. शेख आपल्या चुलत भावाच्या घरी पत्नी व मुलांसह राहत होता. पोलिसांनी एका स्थानिक महिलेच्या मदतीने त्या घरात प्रवेश केला.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

घरात प्रवेश करताच, पोलिसांनी शेखच्या पत्नीला विचारणा केली असता ती आणि शेख दोघांनीही जोरजोरात आरडाओरड सुरू केली. पोलीस उपनिरीक्षक मदन कांबळे यांनी आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले. मात्र शेखने पिस्तूल दाखवत धमकी दिली आणि गोळीबार सुरू केला.

पोलिसांनी शेखला अनेक वेळा शरण येण्यास सांगितले. मात्र त्याने गोळीबार सुरूच ठेवला आणि आपल्या मुलांना आड करून लपण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या प्रत्युत्तरात झालेल्या गोळीबारात शेख गंभीर जखमी झाला. त्याला सोलापूर शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

कारवाईत काही पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. पोलिस उपआयुक्त पंकज देशमुख (गुन्हे) यांनी सांगितले की, “शेखने अटक टाळण्यासाठी गोळीबार केला आणि पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी प्रत्युत्तर दिले.”

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

शेखवर २०११ पासून १५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल होते. त्यात खंडणी, खूनाचा प्रयत्न, जमिन बळकावणे आदी गंभीर आरोप होते. तो २०२१ आणि २०२५ मध्ये मकोका अंतर्गत बुक करण्यात आला होता. कालेपाडळ खूनप्रयत्न प्रकरणात त्याच्यासह १७ जणांवर गुन्हा दाखल होता, त्यातील ९ अटक झाले असून, शेख फरार होता.

पोलिसांनी घटनास्थळी दोन देशी बनावटीची पिस्तुले, नऊ जिवंत काडतुसे आणि दोन कोयते जप्त केले आहेत.

शेखच्या वडिलांनी पोलिसांवर खोटा एन्काऊंटर केल्याचा आरोप केला. रहीम हसन शेख म्हणाले, “माझा मुलगा गुन्हेगारी विश्वातून बाहेर पडून चप्पल व्यवसाय करत होता. पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने त्याच्यावर मकोका लावला होता. म्हणून तो तीन महिन्यांपासून लपून राहत होता.”

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

API कांबळे यांच्या फिर्यादीवरून शेख आणि त्याच्या पत्नीविरोधात खुनाचा प्रयत्न आणि अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109, 132, 3(5), शस्त्र कायदा कलम 3(25), आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3), 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.