राष्ट्रवादी पुन्हा एकत्र सुप्रियाताईं थेट बोलल्या; अजितदादाशी पवित्र नातं जन्मापासून भातुकुलीचा खेळ नाही हे राजकारण!

0
23

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या सुरू असलेल्या चर्चांवर आज वर्धापनदिनाच्या निमित्ताने सगळंच चित्र स्पष्ट होईल, अशी अपेक्षा सबंध महाराष्ट्राला होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमांमध्ये या विलीनीकरणाबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपण पदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले आहेत.

पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी या सर्व मुद्द्यांवर भाष्य केले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, जयंत पाटलांचं भाषण झालं, त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत. दिल्लीवरून परत आल्यावर शरद पवार यांच्या सोबत याबाबत चर्चा करणार आहे. जयंत पाटील हे पक्षाचे अतिशय महत्त्वाचे नेते आहेत.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

मागील सात वर्षे त्यांनी प्रचंड मेहनत करून त्यांनी पक्ष वाढवण्याची चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या भाषणाचा काय अर्थ काढताय हे मला माहिती नाही. मात्र त्यांनी पक्षाला काही सूचना दिल्या असतील तर ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे त्यावर विचार केला जाईल, असे खासदार सुळे म्हणाल्या.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे किंवा कोणी कोणाबरोबर एकत्र जायचं, हा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे. मात्र या चर्चा कॅमेरावर होत नाहीत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. माझा आणि अजित पवारांचा प्रेमाचं पवित्र नातं हे जन्मापासून आहे. त्यामुळे त्यात अंतर येत नाही आणि पवार कुटुंब म्हणून कालही आणि आजही आम्ही एकत्रच आहोत. यात काही वाद नाही.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

माझ्यावर आणि पवार कुटुंबीयावर झालेले संस्कार आहेत. त्यात कधीच बदल होऊ शकत नाही. राजकीय लाईन काही घ्यायची असेल तर दादाला आणि मला दोघांसाठी हा काही बहीण भावांचा खेळ नाही आणि भातुकलीचा खेळ नाही. हे राजकारण आहे. एकत्र येण्याबाबत जो काही निर्णय होईल, तो लोकशाही पद्धतीने सर्वांना विचारूनच होईल, असेही सुप्रिया सुळेंनी स्पष्टपणे सांगितले.