French Open 2025 : कार्लोस अल्काराज बनला चॅम्पियन, आयपीएलपेक्षा जास्त बक्षीस मिळाले एकाच खेळाडूला

0
1

जगातील नंबर-२ टेनिसपटू स्पेनच्या कार्लोस अल्काराजने फ्रेंच ओपन इतिहासातील सर्वात लांब अंतिम सामन्यात इटलीच्या जॅनिक सिनरचा ४-६, ६-७ (४), ६-४, ७-६ (३), ७-६ (२) असा पराभव केला आणि फ्रेंच ओपन २०२५ चे विजेतेपद पटकावले. हा सामना ५ तास २९ मिनिटे चालला.

फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकणाऱ्या स्पेनच्या कार्लोस अल्काराजला बक्षीस म्हणून २ लाख ५५ हजार युरो (सुमारे २५ कोटी रुपये) मिळाले आहेत. जे आयपीएल २०२५ पेक्षा ५ कोटी रुपये जास्त आहे. आयपीएलचे विजेतेपद जिंकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला २० कोटी रुपये मिळाले. इटलीच्या जॅनिक सिनरला १२ कोटी रुपये मिळाले. महिला गटातही हीच रक्कम देण्यात आली आहे.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

रविवार, ८ जून रोजी रोलँड गॅरोसच्या फिलिप चॅटियर कोर्टवर खेळल्या गेलेल्या या टायटल मॅचमध्ये कार्लोस अल्काराझला प्रेक्षकांचा पूर्ण पाठिंबा मिळाला. अल्काराझने सलग दुसऱ्या वर्षी फ्रेंच ओपनमध्ये पुरुष एकेरीचे जेतेपद जिंकले आहे. तर सिनर पहिल्यांदाच फ्रेंच ओपन फायनलमध्ये पोहोचला आहे. अल्काराझने आतापर्यंत दोन विम्बल्डन (२०२३, २०२४), दोन फ्रेंच ओपन (२०२४, २०२५) आणि एक यूएस ओपन (२०२२) जेतेपद जिंकले आहे.

फ्रेंच ओपन जेतेपदाच्या सामन्यात २-२ अशा बरोबरीनंतर, २२ वर्षीय अल्काराझ आणि २३ वर्षीय सिनर यांनी पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये आपला सर्वोत्तम खेळ दाखवला. ५३ मिनिटांच्या खेळानंतर अंतिम सेट देखील ५-५ असा बरोबरीत पोहोचला. पाचव्या सेटच्या ६७ व्या मिनिटाला दोघेही पुन्हा ६-६ अशा बरोबरीत आले. शेवटी, अल्काराझने टायब्रेकरमध्ये सिनरला संधी दिली नाही आणि सेट आणि जेतेपद दोन्ही ७-६ च्या फरकाने जिंकले.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?