नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा काठमांडू नॅशनल स्टेडियम साटोबाटो येथे नुकतीच संपन्न झाली आहे. या स्पर्धेमध्ये कराटे डू कोबुडो असोसिएशनच्या खेळाडूंनी घवघवित यश संपादन केले या स्पर्धेचे आयोजन धनबहादूर स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष संघरत्न महाजन यांनी केले होते नेपाळ देशाचे उपपंतप्रधान प्रकाश मान यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
नेपाळ कराटे असोसिएशनचे युवराज लामा, हिरासिंग डांगोल नेपाळ क्रीडामंत्री मिन कृष्ण महाराजन यांची उपस्थिती होते तसेच श्रीलंका, भूतान, मलेशिया, बांगलादेश इत्यादी देशाने या स्पर्धेत सहभाग नोंदवला या स्पर्धेत कराटे डू कोबुडो असोसिएशन हडपसर पुणे च्या खेळाडूंनी चार गोल्ड, चार सिल्वर, चार ब्रांझ मेडल घेऊन यश संपादन केले.
यशस्वी खेळाडू –
गुंजन पारवे कुमिते गोल्ड काता सिल्व्हर
मृण्मयी किरवे काता गोल्ड कुमिते सिल्व्हर
अर्जुन जायभाय काता गोल्ड कुमिते सिल्व्हर
मृणाली बाजारे (किर्लोस्कर एम्पलोय) काता गोल्ड कुमिते सिल्व्हर
उर्वी साबळे काता ब्राँझ कुमिते ब्राँझ
रेणू चौधरी काता ब्रॉंझ कुमिते ब्राँझ मेडल घेउन यश संपादन केले.
संघ व्यवस्थापक कोच म्हणून सेंसाई माधवी तौर यांनी काम पाहिले यशस्वी खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक सिहान लहू पारवे यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी खेळाडूंचे संपूर्ण परिसरात अभिनंदन कौतुक केले जात आहे.