पुणेकरांनो कोरोनाचा धोका वाढला; सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात, काळजी घ्या ! 24 तासात इतकी लागण

0
1

देशभरात कोरानो रुग्णांची संख्या वाढत असताना महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांत वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवडाभरात सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा वाढला असून मुंबई, पिंपरी चिंचवड सह इतर ठिकाणी संसर्गात मोठी वाढ झाली आहे.राज्यात आता सर्वात जास्त सक्रिय रुग्ण हे पुण्यात असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 65 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून 65 रुग्णांपैकी सर्वाधिक पंचवीस रुग्ण हे पुण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. या एकूण 65 रुग्णांपैकी 25 पुणे महापालिका, मुंबईत 22, ठाण्यात 9, पिंपरी चिंचवड मध्ये 6, कोल्हापूर मध्ये 2 तर नागपूर मध्ये एक अशी सक्रिय रुग्णंची संख्या आहे.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

राज्यात 1 जानेवारी 2025 पासून ते आतापर्यंत एकूण 11501 एवढ्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 814 जण कोरोनाबाधित आढळून आले, त्यातील आता 300 पेक्षा अधिक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर सध्या राज्यात एकूण 506 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान मागील आठवड्यात कोल्हापूरमधील एका महिलेचा तर वसईतील एका पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट मोडमध्ये आला आहे. शुक्रवारी केंद्रीय आरोग्य आणि आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्र कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. सरकार कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे असंही जाधव यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर