गुहागर दि. ३० (रामदास धो. गमरे) आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते, बी.ई.एस.टी मधील निवृत्त आदर्श, कर्मचारी, बौद्धजन सहकारी संघ, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी, विभाग क्र. ६, शाखा क्र. ५१, मौजे खोडदे या शाखेचे प्रमुख सल्लागार माननीय तुकाराम विठू पवार यांचे वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतेच नालासोपारा येथे महानगरपालिका रुग्णालयात दुःखद निधन झाले.






कालकथित तुकाराम विठू पवार हे सोज्वळ मनाचे, हसतमुख, सर्वसमावेशक, मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावाचे होते व स्पष्टवक्ता, आदर्श व्यक्तिमत्त्व असलेले होते, सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते, त्यांच्या अंत्ययात्रेत समाजातील सर्वच थरातील मान्यवर तसेच तालुका संघातील विविध संघटना त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यांच्या अचानक जाण्याने समाजात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सुन, नातू नात, दोन मुली, जावई, त्यांची मुले असा मोठा परिवार आहे.
दिवंगत तुकाराम विठू पवार यांचा पुण्यानुमोदन व शोकसभेचा कार्यक्रम रविवार दि. ८ जून २०२५ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता मुक्काम गाव खोडदे, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी येथे मा. प्रजनशील पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे तरी विभागातील सर्व सभासद, कार्यकर्त्यांनी, विविध आंबेडकरी संघटना व त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आदर्शांस श्रद्धांजली अर्पण करावी अशी विनंती बौद्धजन सहकारी संघ, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी, विभाग क्र. ६, शाखा क्र. ५१, मौजे खोडदे या शाखेच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात केली आहे.











