एलन मस्क यांनी सोडली ट्रम्प यांची साथ, ट्रम्प यांच्या या धोरणाला विरोध; प्रशासनातून वेगळा होण्याचा निर्णय

0
1

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे मानले जाणारे अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांनी ट्रम्प प्रशासन सोडली आहे. ट्रम्प यांचे सल्लागार पद सोडण्याची घोषणा एलन मस्क यांनी केली आहे. सोशल मीडियावर मस्क यांनी ही माहिती दिली. संघीय नोकरशाहीत सुधारणा करण्याचे काम मस्क यांनी केले होते. सरकारी खर्च कमी करण्याची जबाबदारी ट्रम्प यांनी मस्क यांच्यावर दिली होती.

ट्रम्प यांचे मानले आभार

मस्क यांनी X वर पोस्ट लिहिली आहे. त्यात म्हटले की, विशेष सरकारी कर्मचारी म्हणून माझा कार्यकाळ संपत आहे. सरकारी खर्च कमी करण्याची संधी दिल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानू इच्छितो. डीओजीई मिशन कालांतराने अधिक मजबूत होईल. कारण ते सरकार चालवण्याचा एक मार्ग बनेल. डीओजीईचे कामकाज पाहत असल्यामुळे मस्क आपल्या उद्योगाकडे लक्ष देऊ शकत नव्हते.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी एलन मस्क यांना अमेरिकन सरकारमध्ये विशेष सरकारी कर्मचारी म्हणून नियुक्त केले होते. त्यानंतर गेली 130 दिवस सरकारमध्ये काम करत राहिले आणि आपला सल्ला देत राहिले. व्हाइट हाउसमधील अधिकाऱ्याने सांगितले की, विशेष सरकारी कर्मचारी म्हणून मस्क यांची ‘ऑफबोर्डिंग’ बुधवार रात्रीपासून सुरु झाले. मस्क यांनी ट्रम्प यांची साथ सोडण्यापूर्वी ट्रम्प यांनी आणलेले बिग ब्यूटीफुलाला विरोध केला होता. त्यात मल्टी-ट्रिलियन डॉलरसाठी टॅक्स ब्रेक आणि संरक्षण खर्च वाढवण्याचे आश्वासन दिले होते. मस्क यांनी जाहीरपणे या बिलावर नाराजी व्यक्त केली होती.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

टेस्ला कारच्या विक्रीत घट

एलन मस्कच्या टेस्ला कारच्या विक्रीत सतत घट होत आहे. टेस्लाच्या शेअर्समध्ये सतत घसरण होत आहे. यामुळे गुंतवणूकदार बाहेर पडत आहे. दरम्यान, टेस्ला गुंतवणूकदारांनीही मस्क यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मस्कची कंपनी टेस्ला अमेरिकेत मोठ्या प्रमाणात बहिष्काराचा सामना करत आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या विक्रीवर झाला आहे.