गुदमरल्यासारखे वाटते, माझ्या गळ्यात फास आहे, मला यापासून मुक्ती हवी… ‘बाबूराव’ला कंटाळले होते परेश रावल, म्हणूनच त्यांनी सोडला हेरा फेरी ३

0
1

परेश रावल यांनी बॉलिवूडचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘हेरा फेरी ३’ अचानक सोडून सर्वांना आश्चर्यचकित केले. बाबूराव या व्यक्तिरेखेने खास ओळख मिळवलेल्या परेश रावल यांनी हेरा फेरी ३ पासून स्वतःला दूर करून चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. असे म्हटले जात आहे की त्यांनी निर्मात्यांकडून २५ कोटी रुपये फी मागितली होती. पण त्यांना ही रक्कम देण्यात आली नाही. यानंतर त्यांनी चित्रपट सोडला. पण यामागील खरी कहाणी काही वेगळीच आहे. परेश रावल यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत त्यांच्या बाबूराव या पात्राबद्दल नाराजी व्यक्त केली होती आणि त्यांना गळ्यातील फास म्हटले होते. त्यांनी असेही म्हटले की त्यांना यातून मुक्तता हवी आहे.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

काही दिवसांपूर्वी परेश रावल यांनी लल्लंटॉपला एक मुलाखत दिली होती. त्यांना विचारण्यात आले की जेव्हा तुम्ही लोकांमध्ये असता, तेव्हा किती वेळा तुम्हाला सांगितले जाते की तुम्ही हेरा फेरीमध्ये किती अद्भुत काम केले आहे? यावर परेश रावल यांनी अनिच्छेने प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, “तो गळ्यातला फास आहे.”

परेश रावल पुढे म्हणाले, “हेरा फेरी २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता. मी २००७ मध्ये विशाल भारद्वाजकडे गेलो होतो. मी त्यांना सांगितले, माझा एक चित्रपट आहे (२००० चा डान्सर इन द डार्क). मला माझी प्रतिमा फुसून टाकायची आहे. तुम्ही ते करू शकता. जो कोणी येईल, त्याच्या मनात नेहमीच हेरा फेरी असते. मी एक अभिनेता आहे, मला या दलदलीत अडकायचे नाही. पण त्यांनी सांगितले की मी रिमेक करत नाही. त्यानंतर २०२२ मध्ये मी आर. बाल्कीकडे गेलो. मी त्यांच्याकडूनही अशीच मागणी केली. यामुळे मला त्रास होतो.”

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

२००० मध्ये प्रदर्शित झालेला हेरा फेरी हा चित्रपट सुपरहिट ठरला. परेश रावल यांच्यासोबत अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी हे देखील मुख्य भूमिकेत होते. २००६ मध्ये आलेल्या ‘फिर हेरा फेरी 2’ चित्रपटात याच त्रिकुटाने खळबळ उडवून दिली होती. तर ‘हेरा फेरी ३’ साठीही तिघांची नावे अंतिम करण्यात आली होती. प्रियदर्शनने दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. हे अक्षयच्या ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत बनवले जात आहे. जेव्हा परेशने चित्रपट सोडला, तेव्हा अक्षयच्या प्रॉडक्शन हाऊसने त्याला २५ कोटी रुपयांची नुकसानभरपाईची कायदेशीर नोटीस बजावली. तसेच, त्याच्या टीमने सांगितले की अभिनेत्याला लाखो रुपये आधीच देण्यात आले आहेत.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे