पुणे – शिवसेना अल्पसंख्यक शहर प्रमुख मा. अशफाक भाई मोमीन यांच्या वाढदिवसानिमित्त इंदिरा नगर गुलटेकडी पुणे परिसरात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमात लहान मुलांना खाऊ वाटप, तसेच ३०० ते ४०० ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करून त्यांना चष्मे वाटप करण्यात आले.






या उपक्रमात परिसरातील महिला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. कार्यक्रमात मा. आमदार रवींद्र धंगेकर, मा. नगरसेवक अजय भोसले, मा. सुधीर कुरूमकर, राजू मुलानी, अकबर शेख, अनवर मोमीन, शोयब लांडगे, अजरुद्दीन सैय्यद, अहमद मैलाना,मोठ्या संख्येने शिवसैनिक आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल नागरिकांनी अशफाक भाई मोमीन यांचे अभिनंदन केले असून, वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी घेतलेली सामाजिक बांधिलकीची भूमिका वाखाणण्याजोगी असल्याचे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्य नियोजनातून पार पडले असून, यामुळे समाजात आरोग्यप्रती जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली आहे.
तद्प्रसंगी मा. आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. तसेच आरोग्य शिबिराचे उद्घाटन मा. अजय बापू भोसले शिवसेना सहसंपर्क प्रमुख पुणे शहर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.










