मनोज जरांगे यांच्या मेहुण्याला तडिपारीची नोटीस; जरांगे CM फडणवीसांवर संतापले, ”चुकीचे काम केलं तरी…”

0
2

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मेहुण्याला पोलिसांनी तडिपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. पोलिसांच्या कारवाईच्या विरोधात जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. ही कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे षडयंत्र असल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी केला आहे.

मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई केली आहे. तडीपारीची कारवाई झालेल्या आरोपींविरोधात जालन्यातल्या अंबड, घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल झाले आहेत.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

मनोज जरांगेंचा संताप…

या कारवाईबाबत मनोज जरांगे यांनी म्हटले की, तुम्ही अंतरवालीतील आंदोलकांना जर नोटीस देणार असाल, तुम्ही त्यांच्या पाठीमागे असे लागणार असेल तर मी सोडणार नाही फडणवीस साहेब. तुम्ही जर मराठ्यांना वेठीस धरायचं काम केलं तर, तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. राज्यात मराठ्यांशिवाय पान हालू शकत नाही. तुझा भागलं म्हणून जर तू उलटणार असला, हे तुझ्यासाठी घातक असणार आहे, देवेंद्र फडणवीसांनी चूक सुधारावी, त्यांनी दिलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात. आम्ही देवेंद्र फडणवीसला सन्मानाची वागणूक द्यायला तयार आहोत. नाहीतर पुढच्या काळात सन्मान हा शब्द डोक्यातून काढून टाकायचा असा गर्भित इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

फडणवीसांचे षडयंत्र…

मनोज जरांगे यांनी म्हटले की, माझं तोंड बंद करण्यासाठी मुद्दाम माझ्या पाहुण्यारावळ्याचं नाव तडीपारीच्या यादीत घुसवले असावे. हे 100 टक्के देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. देवेंद्र फडणवीसला माहीत नाही की, मी समाजापुढे आई-बापाला सुद्धा जवळ केलं नाही. तर, पाहुण्यारावळ्याला देखील जवळ उभं राहू देणार नाही. मी जोपर्यंत आंदोलनात आहे तोपर्यंत मराठा म्हणून आहे. चुकीचं काम केलं तर माझ्या बापावर जरी केस झाली तरी सोडणार नाही. पाहुण्यांचा तर विषय संपला असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.

स्वत:च्या मुलीच्या शब्दासाठी ५०० पावले ओलांडून जाऊ शकत नाही. माझ्या लेकरांचे मुडदे पडले आहेत. चार मुलांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली आहे. केस मागे घेणार असल्याचे सांगितले. पण, जुन्या केसेस पुन्हा उकरून काढण्यास सुरुवात झाल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले. जनतेला सन्मान द्यायला शिका. तरच लोक सन्मान देतील.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार