राज्यात थंडी झाली कमी, उन्हाचा तडाखा वाढला; हवामान विभागाचा महत्वाचा इशारा

0
1

महाराष्ट्रातील थंडी कमी होत असून हळहळून तापमानात वाढ होताना दिसत आहे. येत्या काही दिवसांता तापमानात आणखी वाढ होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान राज्यातील अनेक भागात थंडी कमी होऊन उकाडा जाणवू लागला आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक 37.2 इतकी तापमानाची नोंद झाली आहे.

फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सुरु होताच राज्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. अनेक भागांत थंडी गायब झाली असून ऊन वाढले आहे त्यामुळे तापमानातही वाढ झाली आहे. आतापर्यंत 37.2 इतकी तापनाची नोंद राज्यात झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक परिसरातही थंडी कमी होऊन उन्हाचा तडाखा वाढला आहे.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

विदर्भातील ब्रह्मपुरी येथे 37.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये पुढील दोन ते तीन दिवस थंडी नाहीशी होत तापमान 37 अंशांचा आकडा गाठत नागरिकांच्या अडचणी वाढवू शकते असाही थेट इशारा मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे. अचानक तापमान वाढल्यामुळे मुंबई शहर, नवी मुंबई, ठाणे, पालघर येथील लोकांनी ऐन दुपारच्या वेळी बाहेर पडू नका असाही सल्ला दिला जात आहे.

फेब्रुवारी हा मुंबईसाठी हिवाळ्यातील शेवटचा आल्हाददायक महिना असतो. कारण मार्चपासून तापमान वाढू लागते आणि कधीकधी फेब्रुवारीच्या अखेरीसच उन्हाळ्याची चिन्हे दिसू लागतात. काल, 5 फेब्रुवारी रोजी, मुंबईचे कमाल तापमान 32.8° सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा 2° सेल्सिअस जास्त होते. याव्यतिरिक्त, आर्द्रतेचे प्रमाण जास्त राहिले, ज्यामुळे दमट आणि अस्वस्थता जाणवत होती.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

पुण्यात कसे असेल तापमान ?

पुण्यातील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. पुण्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने पुणेकरांना उकाडा सहन करावा लागत आहे.