पुण्यात खळबळ NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनी नोट सापडली; नेमका काय आहे प्रकार? सखोल चौकशीची मागणी

0

पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या (NDA) हद्दीपासून अगदी काही मीटर अंतरावरील एका सोसायटीत पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुळशी तालुक्यातील भुकूम येथील स्काय आय मानस लेक सिटी मधील आयरिस- 3 या सोसायटीच्या लिफ्टबाहेर पाकिस्तानी चलनामधील नोट आढळली आहे. याबाबत सोसायटीचे चेअरमन सहदेव यादव यांनी बावधन पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिला असून याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी सोसायटीच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने पोलिसांना केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या लिफ्टच्या बाहेर ही नोट पडलेली असल्याचे सोसायटीचे चेअरमन सहदेव यादव यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने लगेच बावधन येथील पोलिसांना संपर्क करून त्या ठिकाणी जाऊन अर्ज दिला. पाकिस्तानी चलनातील सापडलेली नोट ही वापरातील असून ती अनेक वेळा वापरली असल्याचे तिच्या एकूण स्थितीवरून दिसते.

अधिक वाचा  अजितदादांची ही खेळी पुणेरी राजकारणात मोठी उलथापालथ; 3 पक्षात वादाचा भडका आणि भाजपाची ही गणिते बिघडली आत्ता दुरंगी लढती शक्य

ही नोट या सोसायटीच्या लिफ्टच्या बाहेर कोणाच्या खिशातून पडली की आपल्या देशामध्ये कोणाकडून आली, याचा तपास होण्याची गरज आहे. परिणामी याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी ही आता स्थानिकांनी केली आहे. मात्र हा नेमका प्रकार काय हे तपासानंतर कळणार आहे.