पुण्यात राष्ट्रवादी नेत्याच्या सुनेची आत्महत्या: माहेरच्यांचे गंभीर आरोप, पती, सासू नणंद अटकेत घटनेने खळबळ

0
1

पुण्यात विवाहतेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गटाच्या एका नेत्याच्या सूनने हे टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं आहे. या प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हिने गळफास घेतल्या प्रकरणी पोलिसांनी पती शशांक, सासू लता हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, नणंद करिष्मा हगवणे, दीर सुशील हगवणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर पती, सासू आणि नणंदेला अटक करण्यात केली आहे. या प्रकरणी वैष्णवीच्या आई वडिलांनी बावधन पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

तक्रारीत वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरीक छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या जाचाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचल्याचे वैष्णवी यांच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.वैष्णवी शशांक हगवणे (वय २३ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे.

शुक्रवार दि. १६ मे रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात वैष्णवी यांनी गळफास घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी यांनी बेडरूमचा दरवाजा आतून बंद करत गळफास घेतला. पतीने दरवाजा ठोठावला मात्र, न उघडल्या गेल्याने दार तोडण्यात आलं. त्यानंतर गळफास घेतल्याचे त्यानी पाहिलं. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार