रविंद्र किसनराव रायकर यांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान

0
2

कामगार विश्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या कामगार भूषण पुरस्कार आणि विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारांचे मंगळवार, दि. १३ मे रोजी वितरण करण्यात आले. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते  रविंद्र किसनराव रायकर (कमिन्स इंडिया लिमिटेड, कोथरूड पुणे)यांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी कामगार मंत्री अॅड.आकाश फुंडकर, कामगार राज्यमंत्री  अॅड.आशिष जयस्वाल, आमदार मनिषा कायंदे मनोज जामसुदकर सर्व स्थानिक खासदार व आमदार, तसेच कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, कामगार आयुक्त डॉ.एच.पी.तुम्मोड, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचेवतीने रुपये  रुपये २५ हजार, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

नोकरी करत असतानाच विविध सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक,शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल राज्य शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून रविंद्र किसनराव रायकर यांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

 सदर पुरस्कार हा समाजाला अर्पण करण्याची भावना रविंद्र रायकर यांनी व्यक्त केली. यासाठी कामगार भूषण राजेंद्र वाघ, पुरुषोत्तम सदाफुले यांचे मार्गदर्शन  लाभले. किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष महेंद्र बालवडकर आणि पदाधिकारी  तसेच कमिन्स परिवारातील अधिकारी वर्ग व समाज बांधव हनुमंतराव पांचाळ, गणपतराव गायकवाड, धनराज माने आणि पत्नी निकिता यांनी मोलाची मदत केली असून समाजातून रविंद्र रायकर यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे