पाकिस्तानकडून थेट दिल्लीवर पहाटे ‘मिसाईल अटॅक’, तुमच्या शहरात हल्ला झाला तर काय करावं? सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

0

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमाभागावर सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. पाकिस्तानकडून काल भारताच्या 15 शहरावर हल्ल्याचा प्रयत्न केला गेला. तर आज दिल्लीसह 5 शहरांवर मिसाईल अटॅक करण्यात आला होता. मात्र, इंडियन एअर फोर्सने हा हल्ला यशस्वीरित्या परतवून लावलाय. पाकिस्तानने थेट दिल्लीला टार्गेट केल्याने आता मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. मात्र, नागरिकांनी भयभीत न होता, संयमाने सामना केला. मात्र, जर आता तुमच्या शहरावर हल्ला झाला तर तुम्ही काय काय केलं पाहिजे? जाणून घ्या सरकारकडून आलेल्या महत्त्वाच्या सूचना…

धोक्याच्या क्षेत्रात हवाई हल्ल्याचे सायरन

शत्रूचे क्षेपणास्त्र असो किंवा लढाऊ विमान… जर त्यांनी भारतीय हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असेल, तर भारतीय हवाई दलाची रडार प्रणाली ताबडतोब ते शोधून काढतात. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून सैन्याला त्वरित कारवाई करण्याची परवानगी मिळते. एकदा धोका ओळखला गेला की, क्षेपणास्त्राचा मार्ग आणि वेग यांचे विश्लेषण केले जाते आणि संभाव्य लक्ष्य क्षेत्रांचे नकाशे तयार केले जातात. हल्ला अपेक्षित असण्याच्या काही सेकंद आधी, नागरिकांना सावध करण्यासाठी आणि आश्रय घेण्यासाठी धोक्याच्या क्षेत्रात हवाई हल्ल्याचे सायरन वाजवले जातात. दरम्यान, वायुसेना जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रे आणि इतर संरक्षण प्रणाली वापरून येणाऱ्या धोक्याला निष्प्रभ करण्यासाठी इंटरसेप्शन सिस्टम सक्रीय करते.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

तुमच्या शहरावर एअरस्ट्राईक झाला तर तुम्ही करावं?

जेव्हा एखादा मोठा धोका उद्भवणार असतो. जसे की हवाई हल्ला किंवा क्षेपणास्त्र हल्ला, तेव्हा सायरन वाजवला जातो. एअर सायरन रेड अलर्ट देताच, गर्दीच्या ठिकाणांपासून ताबडतोब सबवे किंवा भुयारी मार्गात आश्रय घ्यावा. मोठ्या शहरांमध्ये बांधलेले भुयारी मार्ग हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. त्यामुळे भुयारी मार्गाला फार धोका नसतो, रॉकेट किंवा क्षेपणास्त्रांचा परिणाम होत नाही. हवाई हल्ला झाल्यास, जर तुम्ही मोकळ्या जागेत असाल तर ताबडतोब कमी उंचीच्या उड्डाणपुलाखाली किंवा सबवेखाली आश्रयला जा. जर तुम्ही इमारतीच्या आत असाल तर लाल सायरन वाजताच मुख्य प्रवेशद्वारापासून दूर जा.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

ताबडतोब सुरक्षित ठिकाणी जावं

इमारतीच्या कोणत्याही भागात जिथे फक्त एकच थर असलेली भिंत असेल किंवा जिथे सर्व बाजूंनी खिडक्या असतील तिथे उभे राहू नका. इमारतीच्या त्या भागात जावे जिथल्या भिंती अतिशय मजबुत आहेत, आश्रयासाठी बाथरूम किंवा पायऱ्यांखालील जागा सुरक्षित मानली जाते. सायरनच्या आवाजात होणारी वाढ आणि घट ही एक धोक्याची सूचना म्हणून काम करते. जेव्हा सायरन 1 ते 3 मिनिटे वाजतो तेव्हा लोकांनी ताबडतोब सुरक्षित ठिकाणी जावे. सायरनचा एकच आवाज, जो वर किंवा खाली येत नाही आणि सुमारे एक मिनिट टिकतो, त्याचा अर्थ असा की धोका टळला आहे आणि आता बाहेर पडणे सुरक्षित आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा

दरम्यान, सायरन वाजताच घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक आणि गॅस उपकरणे, वीजेसह, बंद करा. सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद करा. अन्न, पाणी आणि प्रथमोपचार साहित्यासह आपत्कालीन किट तयार ठेवा. अफवांवर लक्ष देऊ नका आणि फक्त सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा.