भारताने प्रत्युत्तर दिल्यानंतर बाबर आझमचा थरथराट, मोहम्मद अली जिन्नाची आली आठवण

0

दहशतवाद्यांचं आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानवर भारताने हल्लाबोल केला आहे. पहलगाम हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी घेतला होता. या हल्ल्याचं भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याचं जशाच तसं उत्तर दिलं आहे. भारताचं दहशतवाद्यांविरोधातील आक्रमक रूप पाहून पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझमची बोबडी वळाली आहे. त्याने भारताच्या कारवाईचा इतका धसका घेतला की, स्वत:ला सावरण्यासाठी त्याला मोहम्मद अली जिन्नाची आठवण पडली आहे. त्याने भीती लपवण्यासाठी मोहम्मद अली जिन्नांचे शब्द पोस्ट केले आहेत. एखादी व्यक्ती खूपच धास्तावली की भीतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशी कृती अवलंबते. तसंच काहीसं क्रिकेटपटू बाबर आझमने केली आहे. पण मोठ्या गोष्टी करून प्रत्यक्षात त्याचा अवलंब न केल्याने काहीच फरत पडत नाही. भारत कशासाठी प्रत्युत्तर देत आहे याकडे बाबर आझम दुर्लक्ष करत आहे. देशात दहशतवाद फोफावत असताना मूग गिळून बसलेला बाबर आझम अचानक जागा झाला आहे. भारत आता प्रत्येक हल्ल्याचं उत्तर देणार आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

भारताने पाकिस्तानने केलेले सर्व हल्ले निष्फळ केले. त्यानंतर प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या काही शहरांना लक्ष्य केलं. यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. त्यामुळे बाबर आझमने मोहम्मद अली जिन्नाच्या वक्तव्याचा आसरा घेत पोस्ट केली आहे. यात त्याने लिहिलं की, ‘जगात अशी कोणतीच ताकद नाही, जी पाकिस्तानला पराभूत करू शकेल.’ या माध्यमातून भारताने किती हल्ले चढवले तरी काही फरक पडत नाही असं सांगत आहे. पण पाकिस्तान भारतापुढे टिकणार नाही हे स्पष्ट आहे. कारण पाकिस्तानच्या तुलनेत भारताची युद्ध सामुग्री आणि सैन्य दल तिप्पट आहे. त्यामुळे बाबर आझम असून सांगून फार तर मनाला दिलासा देऊ शकतो. या व्यतिरिक्त काहीच नाही. यामुळे त्याचं घाबरणं सहाजिकच आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

22 एप्रिल 2025 रोजी भारतीय नागरिक पहलगाम पर्यटनासाठी गेले होते. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांना टार्गेट केलं आणि 26 नागरिकांचा बळी घेतला. यानंतर भारताने या हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं स्पष्ट केलं. तसेच 7 मे रोजी दहशतवादी ठिकाणांवर हल्ले चढवले. यामुळे दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान खवळलला आणि गुरुवारी भारतावर हल्ले केले. यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. यामुळे पाकिस्तानला पाकिस्तान प्रीमियर लीग स्पर्धा दुबईत खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.