पुणे महापालिका निवडणुक मविआ विरुद्ध पुणे पॅटर्न का? निवडणूक राजकीय समीकरणे बदल; पुणे पॅटर्न पुन्हा चर्चेत

0
1

पुणे महापालिकेत २००७ साली काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी यांनी सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप आणि शिंदेसेनेला बरोबर घेऊन पुण्यात सत्ता आणली होती.हा पुणे पॅटर्न राज्यात गाजला होता. आता राज्यातील सरकारमध्ये भाजपबरोबर शिंदेसेना आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट सहभागी झाला आहे. त्यामुळे आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार आहेत. पुणे महापालिकेतही हा पुणे पॅटर्न पुन्हा होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पुणे महापालिकेची २००७ साली निवडणूक झाली. त्यावेळी काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यातून विस्तवही जात नव्हता. त्यामुळे सुरेश कलमाडी यांना काँग्रेसमधील सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोठी खेळी खेळली. त्यावेळी भाजपचे नेते विनोद तावडे आणि शिवसेनेचे तत्कालीन पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अरविंद सावंत यांना विश्वासात घेतले. पुणे महापालिकेत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, भाजपला बरोबर घेऊन पुणे पॅटर्न तयार केला होता. राष्ट्रवादीच्या राजलक्ष्मी भोसले पुण्याचा महापौर झाल्या होत्या. शिवसेनेला उपमहापौरपद आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले होते.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

भाजपला स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले होते. त्यावेळी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात हा पुणे पॅटर्न मोठा गाजला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पुणे पॅटर्न तोडण्यात आला होता. त्यानंतर पुणे महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आली. त्यानंतर २०१२च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता आली. आघाडीने पाच वर्षे काम केले. २०१७च्या निवडणुकीत पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली.

महाविकास आघाडी विरुद्ध पुणे पॅटर्न अशी निवडणूक होऊ शकते

शिवसेनेमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे शिंदेसेना आणि उद्धवसेना असे दोन गट पडले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे एक गट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बरोबर तर दुसरा गट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर जाणार आहे. काँग्रेस पक्ष उद्धवसेना आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या बरोबर आहे. त्यामुळे पुणे महापालिकेची आगामी निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गट या पुणे पॅटर्न विरुद्ध होण्याची दाट शक्यता आहे.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अजित पवार आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधी केला पण हे बंड राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोडून काढले. त्यानंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आले. अडीच वर्षांनंतर शिवसेनेचे ४० आमदार फुटले. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले. या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे २९ आमदारांसह शिंदेसेना आणि भाजप सरकारमध्ये सहभागी झाले.

पुणे महापालिकेत सध्या प्रशासक राज आहे. आता राज्यातही पुणे पॅटर्न झाला आहे. त्यामुळे पालिका निवडणूक भाजप स्वतंत्र लढविणार का?, शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेऊन पुणे पॅटर्न म्हणून सामोरे जाणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!