तुम्ही सर्वांनी एकत्र या राजगृह तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे – दर्शनाताई आंबेडकर

0

मुंबई दि. १९ (रामदास धो. गमरे) “देशातील सर्व परिस्थिती पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पायमल्ली होत आहे व अराजकता माजली आहे, ठिकठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहेत तर काही ठिकाणी वैमनस्यातून निर्घृण खून होत आहेत, देशात बेरोजगारी, महागाई, सर्वसामान्य मूलभूत गरजांचा वानवा असताना धर्माच्या नावाखाली तरुणांना पदभ्रष्ट करून, तरुणांची माथी भडकवून त्यांना मानसिक गुलाम बनवला जात आहे म्हणून बौद्धजन पंचायत समिती असो, भारतीय बौद्ध महासभा असो, समता सैनिक दल, रिपब्लिकन सेना, वंचित बहुजन आघाडी असो किंवा इतर आंबेडकरी संघटना असो या सर्वांनी प्रथम एकत्र आल पाहिजे, आपण सर्व एकत्र येऊन आम्ही सर्व एकत्र आहोत ही भावना सर्वात निर्माण होणे आवश्यक आहे आम्ही सर्व एकत्र आहोत म्हणून तुम्ही सर्व एकत्र आलात तर राजगृह तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, बाळासाहेबांचे हात बळकट करा” असे प्रतिपादन मा. दर्शना ताई भीमराव आंबेडकर यांनी शिवडी येथे लाडक्या बहिणीला साड्या व लाडक्या भावाला टीशर्ट वाटप करीत असताना प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत असता केले.

अधिक वाचा  बाल्कनीतील कपड्यांवर निर्बंध घालण्यापूर्वी पुणे महापालिकेने कचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर कराव्यात: पतित पावन संघटनेची मागणी

वंचित बहूजन आघाडी वार्ड क्र. २०१, शिवडी विभाग यांच्या विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वा जयंती महोत्सवानिमित्त वंचित बहुजन आघाडी तालुका महासचिव राजा पवार यांच्या अध्यक्षतेखाली लाडक्या बहिणीला साडी वाटप आणि लाडक्या भावाला टिशर्ट वाटप असा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा सुनीता गायकवाड, वडाळा तालुका अध्यक्ष रोहन पवार, वार्ड अध्यक्ष मुकेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष नितीन खरावतेकर, जिल्हा संघटक राजेश तांबे, माजी उपाध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, तालुका सचिव निलेश पवार, तालुका महिला कार्यकारिणी, वार्ड कार्यकारिणी आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा  शिक्षक मतदारसंघातील मतदानादरम्यान उमेदवार ढसाढसा रडला, सर्व व्यवस्थेवरचा विश्वास उडालाय, मी इस्लाम स्वीकारणार

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राजा पवार यांनी प्रथमच आपल्या लाडक्या बहिणींना साडी व लाडक्या भावाला टिशर्ट वाटप हा कार्यक्रम प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंती निमित्त आयोजित केला होता त्याला संपूर्ण तालुक्यातून पाठिंबा मिळाला व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला, या उस्फुर्त कार्यक्रमा प्रसंगी अनेकांनी आपले विचार व्यक्त करीत असताना आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि बाळासाहेबांचे हात मजबूत केले पाहिजेत असा विचार सर्वांनीच व्यक्त करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, सरतेशेवटी अनेक राजा पवार यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  देवेंद्र फडणवीसांनी 25 किलो वजन 56व्या वर्षी कसं कमी केलं? त्यांच्या फिटनेसच्या सहज सुलभ गोष्टी सर्वांना शक्य