नवले पुलावर ब्रेक फेल-ट्रकची धडक, दुचाकीस्वार टायरखाली, अवघ्या ८-१० तासांत दोन भीषण अपघात आणि दोन जणांचा मृत्यू

0

पुणे : नवले ब्रिजवरील अपघात मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाही. अवघ्या १० तासांत नवले ब्रिजवर दुसऱ्यांदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. वेगात असलेल्या ट्रकने दोन ते तीन वाहनांना जोरदार धडक दिल्याने एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून, इतर काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे घडला. ब्रेक फेल झाल्यानंतर ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि समोरून जाणाऱ्या वाहनांवर ट्रक आदळला. या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून, इतर वाहन चालक व प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

या अपघातात तीन ते चार वाहनांचे नुकसान झाले असून, काही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

विशेष म्हणजे, याच नवले ब्रिजवर काही तासांपूर्वी आणखी एक अपघात झाला होता. त्या अपघातातही एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अवघ्या ८-१० तासांत दोन अपघात आणि दोन जणांचा मृत्यू झाल्याने नवले ब्रिजवरील सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. ट्रक व मोठ्या वाहनांची तपासणी, वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त उपाय गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता