मोठी बातमी महाराष्ट्रात बदलाची हवा! राज ठाकरेंचे उद्धव यांच्यासोबत युतीचे संकेत; म्हणाले, आमचे वाद किरकोळ

0

राज्याचं राजकारण गेल्या काही काळापासून प्रचंड अस्थिर झालं आहे. यापार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात पुन्हा बदलाची हवा वाहू लागली आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीचे संकेत दिले आहेत. निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव मे ट्रुथ’ या पॉडकास्टमध्ये याबाबतच विधान केलं आहे. आपली सविस्तर भूमिका मांडताना आम्हा दोघांमधील वाद किरकोळ आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं?

राज ठाकरे यांना महेश मांजरेकर यांनी थेट प्रश्न विचारला की, शिवसेना फुटली किंवा नाही फुटली, तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? यावर राज ठाकरेंनी स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी म्हटलं की, मी कधी आयत्या पिठावर रेघोट्या मारत नाही. मुळात शिंदेंचं बाहेर, त्यांचं फुटणं आमदार घेऊन बाहेर जाणं हे वेगळ्या राजकारणाचा भाग झाला. मी शिवसेनेतून बाहेर पडणं हे वेगळं आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

माझ्यासोबत आमदार, खासदार सर्वजण यायला तयार होते. माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती की बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. मी जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा माझी मनस्थिती अशी होती की, बाळासाहेब असोत किंवा उद्धव असोत त्याच्याबरोबर मला काम करायला काहीच हरकत नव्हती.

पण समोरच्याची इच्छा आहे का? मी त्याच्यासोबत काम करावं? यावर मांजरेकरांनी विचारलं की, पण महाराष्ट्राची इच्छा आहे ना! यावर राज ठाकरे म्हणाले, “मग महाराष्ट्रान जाऊन सांगावं तिकडं. प्रश्न असा आहे की अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी कधी माझा इगो मध्ये आणत नाही”

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता