टेस्ला भारतात एन्ट्री पक्की! उपराष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर पुढील आठवड्यात महाराष्ट्र या 2 शहरांत कार तयार?

0

जगप्रसिद्ध टेस्ला कारचं भारतात उत्पादन करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून एलॉन मस्क यांचा आटापीटा सुरू आहे.भारतीयांनाही टेस्लाचं मोठं आकर्षण आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलॉन मस्क यांच्याशी संवाद साधला आहे. त्यामुळे भारतात टेस्लाचं उत्पादन सुरू होण्यासाठी ही चर्चा महत्त्वाची मानली जात आहे. जर भारतात टेस्लाचा मार्ग मोकळा झाला तर महाराष्ट्रातील चाकण आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये टेस्लाचे प्लांट उभारण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की, त्यांनी अमेरिकेचे अब्जाधीश उद्योजक एलॉन मस्क यांच्याशी संवाद साधला असून, तंत्रज्ञान आणि नवीन उपमक्रम क्षेत्रात सहकार्याबाबत चर्चा केली. पुढील आठवड्यात अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हॅन्स भारत दौऱ्यावर येत आहेत, त्याआधी ही बैठक झाली आहे. त्यामुळे या भेटीला आणखी महत्त्व आलं आहे. यासोबतच भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार करारासाठी सुरू असलेल्या वाटाघाटींच्या पार्श्वभूमीवरही ही चर्चा महत्त्वाची ठरणार आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

या संवादानंतर पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट लिहिली आहे, यात नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे की, एलॉन मस्क यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, ज्यात यापूर्वी वॉशिंग्टन डी.सी. येथे झालेल्या भेटीत विचारले गेलेले विषयही होते. तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात सहकार्याची अफाट शक्यता यावर चर्चा झाली. या क्षेत्रांमध्ये अमेरिकेसोबतची भागीदारी मजबूत करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.”

मोदी आणि मस्क यांची फ्रेब्रुवारी महिन्यात भेट झाली होती. पंतप्रधान मोदी यांनी वॉशिंग्टन डी.सी. येथे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीसाठी गेले होते. त्या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी सांगितले होते की, त्यांनी “अंतराळ, गतिशीलता, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम” याबाबत चर्चा केली होती.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

एलॉन मस्क, टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्सचे मालक आहेत. तसंच सध्या ते अमेरिकेच्या ‘Department of Government Efficiency’ (DOGE) चे नेतृत्व करत आहेत, त्यांनी आपल्या कुटुंबासह मोदींची भेट घेतली होती. अमेरिकेतील अनावश्यक खर्च कमी करण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या मोहिमेचे नेतृत्व मस्क करत आहेत, तरीही या मोहिमेवर टीका होत असून अनेकांनी त्यातील विसंगती दाखवून दिल्या आहेत. तरीदेखील मस्क यांचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. मस्क यांनी व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांच्यासोबत काही संयुक्त पत्रकार परिषदही घेतल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्णी एलॉन मस्क भारत भेटीवर येणार होते. त्यावेळी भारतात कार उत्पादन प्रकल्पासाठी २ अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणुकीची घोषणा करण्याची शक्यता होती. मात्र टेस्लाचे विक्रीसंबंधीचे आकडे समाधानकारक नसल्यामुळे आणि कंपनीच्या शेअर बाजारातील मूल्यात घट झाल्यामुळे ही भेट पुढे ढकलण्यात आली. भारतात इलेक्ट्रिक कार विक्री वाढत असली तरी एकंदर प्रमाण अद्याप कमी आहे. भारत सरकारने टेस्लासाठी खास धोरण आणले असून, त्याअंतर्गत वर्षाला ८,००० इलेक्ट्रिक कार कमी म्हणजेच केवळ १५ टक्के आयात शुल्कात देशात आणता येणार आहेत.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा