जागतिक महिला दिन संपन्न झाला असून जगभरात हा दिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच अनुषंगाने आपल्या वारजे-कर्वेनगर प्रभागातील भगिनींनाही स्वतःच्या पायावर उभे राहण्यात सहाय्य व्हावे, यासाठी आपण ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट आणि अंतरंगी डिजायनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हॅन्ड एम्ब्रॉयडरी अर्थात आरी वर्क प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. गेल्या एक महिन्यापासून सुरू या शिबिरात तब्बल ४०० भगिनींनी या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेत उपक्रम यशस्वी केला. अत्यंत एकाग्रता आणि चिकाटी मनी ठेवून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या या भगिनींना पाठबळ मिळावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहताना आमचाही खारीचा वाटा असावा, हा विचार करत आरी वर्क किट आणि प्रशस्तीपत्र प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आदरणीय खा. सुप्रियाताई सुळे यांनी वेळात वेळ काढत कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती दर्शवली आणि आमच्यासह भगिनींना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावरती माजी नगरसेविका लक्ष्मी देवराम दुधाने, स्वप्निल लक्ष्मी देवराम दुधाने अध्यक्ष – कोथरूड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.






एकही धागा चुकल्यास पुन्हा नव्याने हे काम करावे लागते, अशी हस्तकला या भगिनींनी आत्मसात केली असून आपली प्राचीन भारतीय संस्कृती जपत प्रचंड रोजगार निर्मिती होईल, अशी आशा वाटते. याबद्दल आदरणीय सुप्रियाताई यांनी माजी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने आणि स्वप्निल देवराम दुधाने यांच्या टीमचे मनसोक्त कौतुक करत भविष्यातही असे अधिकाधिक उपक्रम आयोजित करावे, अशा शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी चंचलाताई भोसले आणि सहकारी भगिनी प्रियंकाताई भोसले यांचे विशेष सत्कार करत प्रशिक्षक म्हणून आपली जबाबदारी चोख पार पाडल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष श्री. गिरीशजी गुरनानी, महिला अध्यक्षा प्रियांकाताई तांबे, कोथरूडचे माजी युवक अध्यक्ष श्री. प्रमोदजी शिंदे, पुणे शहराच्या महिला सरचिटणीस संगीता ताई लिंबोळे, प्रभागातील सहकारी पल्लवी ताई शेडगे, सुनीता ताई पवार, माझे सहकारी मित्र आणि कर्वेनगर वारजे प्रभागाचे अध्यक्ष सूत्रसंचालक किशोरजी शेडगे तसेच अनेक भगिनी माता उपस्थित होत्या.










