कुणाल कामराला मोठा दिलासा; बजावलेल्या नोटीसीतील मोठी चूक पथ्यावर शिंदे प्रकरणी अटकेपासून संरक्षण हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

0

शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंनात्मक गाण्यातून टीक केल्यानंतर शिवसैनिक स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरावर चांगलेच संतापले होते. यावेळी, कुणाल कामराला दिसेल तिथं ठोकणार, मारहाण करणार अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली होती. त्याच अनुंषगाने त्याला फोनही केला. मात्र, तो चेन्नईत होता. त्यामुळे, येथील खार पोलीस ठाण्यात कुणाल कामराविरुद्ध शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा नोंद केला आहे. त्यावरुन, जबाब नोंदविण्यासाठी कुणाल कामराच्या अटकेची मागणी होत असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने कुणाल कामराला मोठा दिलासा दिला आहे. पोलिसानी बजावलेल्या नोटीसचा संदर्भात 35(3) अंतर्गत कुणाल कामराला पहिली नोटीस पाठवण्यात आली होती. ज्याचा अर्थ होतो की, त्याच्या अटकेची गरज नाही, असे मुंबई उच्च न्यायलायाने म्हटले आहे. त्यामुळे, कुणाल कामराला अटकेपासून संरक्षण मिळालं असून आता तो जिथं आहे, तेथील पोलीस स्टेशनमध्ये आपला जबाब नोंदवू शकणार आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

कुणाला कामरा यांना शिवसेना कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. तसेच, मुंबईत आल्यास त्यांच्या जीवाला धोका असल्याचंही कामरा यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे, जर कुणाल कामरा मुंबईत आले तर त्यांच्या सुरक्षेची हमी, मुंबई पोलिसांनी घ्यावी. कामराच्या जीविताला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये याकरिता, योग्य काळजी घेणार का? असा सवाल न्यायालयाने सरकारी वकिलाना विचारला. त्यावर, प्रत्येक नागरिकाची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे, असे सरकारी वकिलांनी म्हटले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांच्या द्विसदस्य खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

उच्च न्यायालयात आणि कुणाल कामराच्या प्रकरणात सुनावणी पार पडली. त्यावेळी, न्यायालयाने कामराच्या वकिलांना उद्देशून काही सूचना केल्या आहेत. आम्ही जर तुम्हाला तिथे जाऊन जबाब नोंदवण्याची परवागी देत आहोत मग काय हरकत आहे? असे न्यायालयाने म्हटले. तर, कुणाल कामरा मुंबईत कधी येतात असा सवालही उच्च न्यायालयाने विचारला. तसेच, आम्ही तिथल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने जबाब नोंदवण्यासाठी सहकार्य करण्याबाबत सूचना करू शकतो. आपण जबाब नोंदवा, पण अटक करण्याची गरज नाही, हे तर पोलिसांनीही आपल्या समन्समध्ये म्हटलं आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यालयाने आज झालेल्या सुनावणी नोंदवले. त्यामुळे, कुणाला कामराला अटकेपासून संरक्षण मिळालं आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

जबाब नोंदवण्यासाठी अटकेची गरज नाही

दरम्यान, कुणाल कामराचा जबाब नोंदवण्याच्या मागणीवर मुंबई उच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. मात्र, त्यासाठी कामराच्या अटकेची गरज नसल्याचे स्पष्ट केलं. तसेच, दाखल गुन्ह्यासंदर्भात जबाब नोंदवण्यासाठी खार पोलिसांसमोर दोन पर्याय ठेवले आहेत. तुम्ही व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे जबाब घ्या किंवा चेन्नईला जाऊन जबाब नोंदवा. तेथील स्थानिक पोलिसांना आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यास सांगतो, असे न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे.