राहुल गांधींवर महिला खासदारांचे गंभीर आरोप मी ‘अनकम्फर्टेबल’ थेट सभापतींसमोर रडल्या …..मी अनुसूचित जमातीतील मला सुरक्षा हवी

0
10

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर भाजपच्या दोन खासदारांनी धक्काबुक्कीचा आरोप केला आहे. या दोन्ही खासदारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातच राहुल यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. भाजपच्याच एका महिला खासदाराने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज्यसभेच्या उपसभापतींसमोर याबाबत तक्रार करताना त्या रडल्याचेही समोर आले आहे.

https://x.com/ANI/status/1869672256991080680?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1869672256991080680%7Ctwgr%5E814e0c19f30baddd355e05ae9f3cae465ea33abe%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

नागालँडमधील भाजपच्या खासदार फांगनोन यांनी राहुल गांधीची तक्रार राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याकडे केली आहे. राज्यसभेचे कामकाज दुपारी दोन वाजता सुरू झाल्यानंतर फांगनोन यांनी सभागृहात याबाबत माहिती देत तीव्र नाराजी व्यक्त केली. धनखड यांनीही फांगनोन यांनी आपल्याकडे तक्रार आल्याचे सांगितले.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

फांगनोन कोन्याक यांनी राज्यसभेत बोलताना सांगितले की, मी राज्यसभेच्या सभापतींना भेटले आहे. मी माझ्या सुरक्षेची मागणी करते. आता माझे मन खूप दुखी आहे. आज संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असताना राहुल गांधी माझ्या अत्यंत जवळ येऊन उभे राहिले. त्यामुळे मी अनकम्फर्टेबल झाले होते. राहुल गांधी माझ्यावर ओरडलेही.

एका महिला खासदारांवर अशाप्रकारे ओरडणे राहुल गांधींना शोभा देत नाही. मी खूप दुखी असून मला सुरक्षा हवी आहे. मी अनुसूचित जमातीतील असून राहुल यांची ही वागणूक योग्य नव्हती, असे कोन्याक यांनी राज्यसभेत सांगितले. सभागृहात धनखड यांनीही कोन्याक या माझ्याकडे रडत आल्याचे सांगितले. माझ्याकडे त्यांनी लेखी तक्रार दिली आहे. त्यांना मोठा धक्का बसला आहे. मी या प्रकरणात लक्ष घातले असल्याचे धनखड यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

दरम्यान, कोन्याक यांनी राहुल गांधींची तक्रार केल्यानंतर लगेचच सभागृहात केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी जोरदार प्रहार केला. राहुल गांधी यांनी लोकशाही विरोधी कृती करत आमच्या खासदारांसोबत धक्काबुक्की केली आहे. आमचे दोन खासदार जखमी झाले आहेत. भाजपच्या महिला खासदारांनाही राहुल गांधींनी धक्का दिला.