मुंबई दि. १७ (अधिराज्य) बौद्धजन पंचायत समिती, शिवडी गटक्रमांक १३ आणि संलग्न सर्व शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती महोत्सव अर्थात भीममहोत्सव – २०२५ शिवडी गटक्रमांक १३ चे गटप्रमुख राजाभाऊ तथा आदरणीय रामदास धो. गमरे यांच्या अधिपत्याखाली आणि विभाग कमिटीच्या माध्यमातून मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.






सदर कार्यक्रमात प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे बाबासाहेबांच्या आणि महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आल्या, पुढे प्रविण तांबे गुरुजींनी अत्यंत लाघवी, मधाळ व रसाळवाणीने धार्मिक पूजाविधी संपन्न केला तद्नंतर बाबासाहेबांना व महापुरुषांना अभिवादन मानवंदना करून भव्यदिव्य अश्या मिरवणुकीला सूरवात होण्याआधी स्थानिक कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर व रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस स्टेशनच्या चौधरी मॅडम, जाधव मॅडम यांच्या शुभहस्ते रथावरील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित करून भव्यदिव्य मिरवणुकीला सुरवात झाली. फटाक्यांची आतिषबाजी, रोषणाई झगमगाट वाजत-गाजत-नाचत ही भव्यदिव्य मिरवणूक मातोश्री टॉवर जवळ पोहोचली तेथे स्थानिक शाखा क्र. ४७६ ने मिरवणुकीचे प्रशंसनीय असे भव्य स्वागत केले त्या स्वागताचा स्वीकार करून मिरवणूक पुढे सरकत सरकत भीमनगर येथे दाखल झाली तेथेही स्थानिक शाखा २८२, ३३५ व अजित धोत्रे यांनी जेसीबीने बाबासाहेबांच्या पुतळ्यावर फुलांचा वर्षाव करीत बाबासाहेब आंबेडकरांचे व मिरवणुकीचे प्रशंसनीय असे भव्य स्वागत केले व मिरवणुकीत सामील सर्वांना पाणी व अल्पोपहार देऊन त्यांच्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण केली, पुढे मिरवणूक आगेकूच करीत विश्वभारती पटांगणात पोहोचली त्याठिकाणी शिवसेना नगरी शाखा क्र. ३१८ व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राजा पवार व जाधव यांनी मिरवणुकीचे प्रशंसनीय असे भव्य स्वागत करीत त्यांनीही मिरवणुकीत सामील सर्वांना पाणी व अल्पोपहार दिला पुढे मिरवणूक विठ्ठल मंदिर येथे पोहोचताच तेथील स्थानिक शाखेने ही मिरवणुकीचे प्रशंसनीय असे भव्य स्वागत केले त्या स्वागताचा स्वीकार करून मिरवणूक पुढे सरकत सरकत ममता सोसायटी येथे दाखल झाली तेथेही स्थानिक शाखा क्र. २३८, ३१० यांच्या वतीने मिरवणुकीचे भव्य स्वागत करण्यात आले तेथून पुढे जात मिरवणूक भारत नगर येथे दाखल झाली तेथे साई सेवा मंडळ व आंबेडकर नगरच्या शाखा क्र. ५०८ यांच्या वतीने मिरवणुकीचे भव्य असे स्वागत करण्यात आले तेथून पुढे मिरवणूक वाजत-गाजत-नाचत अण्णाभाऊ साठे नगर येथे दाखल होताच स्थानिक शाखा क्र. ५७८, माता रमाई महिला मंडळ व पंचशील मंडळाच्या वतीने मिरवणुकीचे फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य स्वागत करण्यात आले तेथे लाडू, पाणी व नाश्त्याची सोय केली, पुढे आर के ग्रुप येथे ही मिरवणुकीचे भव्य स्वागत करण्यात आले तेथून पुढे नाक्याजवळ मनसे पक्षाच्या वतीने ही मिरवणुकीचे भव्य असे स्वागत करण्यात आले, पुढे रिपब्लिकन सेनेचे स्वागत स्वीकारत मिरवणूक भोईवाडा नाका येथे दाखल झाली सदर मिरवणुकीत माजी खासदार शेवाळे, माजी कार्यसम्राट नगरसेवक अनिल मोरे, कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर, आमदार चौधरी, माजी महापौर श्रद्धा जाधव, शिवसेनेचे सुरेश काळे, मुंबई काँग्रेसचे महेंद्र मुंगणेकर, शिंदे गटाचे राजू वाघमारे, आरपीआय नेते दीपक भाई गमरे, गौतम गायकवाड, समाजसेवक दीपक बनसोडे अश्या अनेक राजकीय पक्षांचे आमदार, खासदार, नगरसेवक, कार्यकर्ते या मिरवणुकीत सहभागी होऊन त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पसुमन अर्पण करून बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली. सदर मिरवणुकीत जाती-पातीच्या, धर्माच्या बंधनांच्या, उच्च नीचतेच्या भिंती पाडून हिंदू, मुस्लिम, बौद्ध, कामाठी समाजातील विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक संघटनांनी व व्यक्तींनी मिरवणुकीत सहभागी होऊन बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देत बाबासाहेबांप्रति कृतज्ञता व्यक्त केली त्यामुळे गेल्या चाळीस वर्षांचा रेकॉर्डब्रेक अशी भव्यदिव्य मिरवणूक सरकारी नियमांचे पालन करीत कोणतेही गालबोट लागू न देता शांततेत सदर भव्यदिव्य मिरवणूक पार पडली. तसेच रफी अहमद किडवाई पोलीस स्थानकाचे वरिष्ठ निरीक्षक रणदिवे साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने ही मिरवणूक निघावी म्हणून त्यावर लक्ष ठेवून त्यावर नियंत्रण ठेवण्याचे मोठे काम केले, सोबतच यंग बॉईज मंडळाने ही सदर कामास आपले योगदान दिले.
सदर भीममहोत्सव-२०२५ यशस्वी होण्यासाठी शिवडी गटक्रमांक १३ चे गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, कार्याध्यक्ष संतोष जाधव, सरचिटणीस संदीप मोहिते, उपाध्यक्ष राजू धोत्रे, प्रमोद लोखंडे, हरीश मोरे, चिटणीस अजय पवार, नरेश सकपाळ, खजिनदार प्रवीण तांबे (गुरुजी) या सर्वांनी अथक परिश्रम घेऊन सदर भीममहोत्सव-२०२५ यशस्वीपणे पार पाडला. सरतेशेवटी सदर भीमशक्तीचे शक्तिप्रदर्शन व एकोपा दाखवण्यासाठी आयोजित भीममहोत्सव-२०२५ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या विभागीय सर्व शाखा, समित्या, विविध संघटना, राजकीय पक्ष, त्यांचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते, महिला मंडळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणदिवे साहेब व पोलीस डिपार्टमेंटचे आभार मानून राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.










