रॉबर्ट वाड्रा हाजीर हो! ईडीने पाठवले पुन्हा समन्स, शिकोहपूर येथील जमिनीचे काय आहे प्रकरण?

0
1

काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांचे पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पु्न्हा समन्स पाठवले आहे. यापूर्वी वाड्रा यांना 8 एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होता. त्यानंतर त्यांना आज, 15 एप्रिल रोजी कार्यालयात हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे. शिकोहपूर जमीनप्रकरणात ही चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

केंद्रीय तपास यंत्रणेने गेल्या वर्षी मनी लॉड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात त्यांनी यापूर्वी वाड्रा यांना चौकशीसाठी बोलवले होते. पण ते त्यावेळी हजर झाले नाही. त्यामुळे ईडीने त्यांना आज कार्यालयात हजर राहण्यासाठी पुन्हा समन्स पाठवले. आज वाड्रा हजर होतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

शिकोहपूर येथील जमिनीचे काय प्रकरण?

अंमलबजावणी संचालनालयाने हरियाणा राज्यातील शिकोहपूर येथील जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लॉड्रिंगप्रकरणात दुसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. यापूर्वी 8 एप्रिल रोजी वाड्रा यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावेळी ते हजर न झाल्याने आता त्यांना पुन्हा आज हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा वाड्रा यांच्या स्काईलाईट हॉस्पिटॅलिटीशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात तपास करत आहेत.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

वाड्रा यांचे ते वक्तव्य चर्चेत

काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाड्रा एका कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी राजकारणात प्रवेशाची इच्छा जाहीर केली. लोकांची इच्छा असेल तर आपण पूर्ण ताकदीने उतरून काम करू असे ते म्हणाले. त्यांनी यापूर्वी सुद्धा अशी इच्छा व्यक्ती केली.