दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गरोदर महिला मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच मोठ पाऊल; उद्या पुढची दिशा निश्चित

0

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गरोदर महिला तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणानंतर गंभीर आरोप केले जात आहेत. यातच डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचा आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण आता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून घैसास यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलनं तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर डॉ. घैसास तसेच पीडित भिसे कुटुंबीय यांना मेडिकल कौन्सिलच्या मुंबई येथील कार्यालयात सुनावणीसाठी बोलावले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने पाठवलेल्या नोटीसला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील तत्कालीन डॉ. सुश्रुत पैसास यांना सोमवारी (ता.14) संध्याकाळपर्यंत लेखी उत्तर देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर या उत्तरानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल डॉ. घैसास तसेच पीडित कुटुंबीय यांना चौकशी होणार असल्याची माहिती आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रशासक डॉ. विंकी रुथवाणी यांनी या नोटिसबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, राज्य महिला आयोगानं दिलेल्या आलेल्या सूचनांनंतर व पीडित भिसे कुटुंबीयांच्या तक्रारीनंतरच डॉ. पैसास यांना नोटीस बजावत त्यांना खुलासा मागितला आहे. यामुळे घैसास यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पुण्यातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये आतापर्यंत सरकारला दोन अहवाल प्राप्त झाले आहेत. या अहवालानंतर देखील अद्याप सरकारकडून कोणतीही कारवाई दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर करण्यात आली नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशातच महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी याबाबत खुलासा केला आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

चाकणकर म्हणाल्या, जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाणार आहे. पुण्यातील तनिषा भिसे हिच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोप केले जात आहे. या प्रकरणात दोन अहवाला प्राप्त झाल असून मंगळवारी (ता. 15) ससून रुग्णालयाच्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल प्राप्त होणार आहे. उद्या सायंकाळी 5 वाजता हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढची दिशा निश्चित होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.