मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी म्हणणाऱ्या वडेट्टीवारांना दादांचं उत्तर, म्हणाले… कुटुंबाचं योगदान हे भारताला नाही तर जगालाही माहिती!

0

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध रूग्णालय दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये तनिषा भिसे यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे भिसे यांना आपली पत्नी गमवावी लागली. मंगेशकर रूग्णालयाला भिसे यांच्या मृत्यूला जबाबदार पकडलं असून आता तिसरा अहवाल समोर येणार आहे. या प्रकरणावरून राजकारण तापलं असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबावर निशाणा साधला आहे. मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी असल्याचा घणाघात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. यावर अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

मंगेशकर कुटुंबाचं गाणं म्हणण्यापलीकडे काही योगदान नाही. ज्यांनी ऑटोग्राफसाठी पैसे घ्यावेत त्यांच्याकडून काय योगदानाची ठेवायची. गाणं म्हटलं म्हणजे योगदान नाही, लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल. मला माहित नाही, मी कधी ऐकलं नाही, माझ्या २५-३० वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये ऐकलं नाही, त्यामुळे या कुटंबाप्रती प्रेम आस्था असण्याचं कारण नाही, असं विजय वडेट्टीवरांनी म्हटलं आहे. यावर अजित दादांनी आपली प्रतिक्रिया देताना मंगेशकर कुटुंबाचं योगदान हे भारताला नाही जगाला माहिती असल्याचं म्हटलंय.

मंगेशकर कुटुंबाचं योगदान हे भारताला नाही जगाला माहिती आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर मीना मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर असतील या पाचही भावंडांचं योगदान आहे त्याला तोड नाही. महाराष्ट्रीय जनतेला आपलेपणा आहे, आदर आहे त्याच्यामुळे कोणी बोलू नये असं वाटतं, असं अजित म्हणाले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती