फेकून टाका वाघ्या कुत्रं, इंडियामध्ये लांब कानाचं कुत्रं… ही ब्रिटिश कुत्री नक्की काय म्हणाले उदयनराजे?

0

“छत्रपती शिवाजी महाराजांच राष्ट्रीय स्मारक दिल्लीत व्हावं. मुंबईत अरबी समुद्रात पंतप्रधान मोदींच्या हस्ते स्मारकाच भूमीपूजन झालं. मी सुद्धा त्यावेळी तिथे होतो. कदाचित पर्यावरणामुळे तिथे करता येत नसेल, तर गर्व्हनर हाऊसची जागा आहे. ही जवळपास 48 एकर जागा आहे. एखाद्या राज्यपालाला रहायला किती जागा लागते?. 48 एकर थोडी जागा नाही. ही जागा अरबी समुद्राला लागून आहे. त्या संदर्भात मी अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे” असं खासदार उदयनराजे म्हणाले.

“छत्रपती शिवाजी महराजांच राज्य हे रयतेच राज्य म्हणून ओळख होती. आज आपण ज्या लोकशाहीच वावरतो, त्याचा ढाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला. आम्ही ज्या मागण्या केल्या आहेत, त्याला कुठल्याही पैशाची किंवा बजेटची आवश्यकता नाही” असं उदयनराजे भोसले म्हणाले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

‘फुले’ चित्रपटाच्या वादावर काय म्हणाले?

महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर येणाऱ्या ‘फुले’ चित्रपटाबद्दल सुद्धा उदयनराजे बोलले आहेत. सेन्सॉर बोर्डाने त्यातील काही संवाद आणि दृश्यांवर कात्री चालवली आहे. त्यावर उदयनराजे म्हणाले की, “जे महाराजांना लागू होतं, ते महात्मा फुलेंना सुद्धा. महाराजांपेक्षा कोणी मोठा नाही. ज्यांनी महाराजांच्या विचारांच अनुकरण केलं, त्या सर्वांना लागू होतं. इतिहासकाराचं एक सेन्सॉर बोर्ड निर्माण करा. जे काय कट करायचं ते ठरवतील” असं उदयनराजे म्हणाले. छावा चित्रपटावरुन झालेल्या वादावर सुद्धा त्यांची हीच भूमिका होती.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर काय म्हणाले?

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरुन सुरु असलेल्या वादावरही उदयन राजे बोलले आहेत. “चॅरिटेबल म्हणजे काय, ही शासनाची जागा आहे. किमान 50 ते 70 मोठे चॅरिटेबल हॉस्पिटल असतील, किती चॅरिटी करतात ते. त्यांना ही जागा फ्री मध्ये दिली आहे. गरजूंवर मोफत उपचार झाले पाहिजेत. असं कोणी करत नाही, याचं ऑडिट झालं पाहिजे” असं उदयनराजे म्हणाले.

वाघ्या कुत्र्याच्या वादावर काय म्हणाले?

रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पावरुन सुरु असलेल्या वादावर त्यांनी रोखठोक भूमिका मांडली. “वाघ्या ते कुत्र बघा, ते इथलं तरी आहे का? लांब कानाचं कुत्रं इंडियामध्ये बघितलय का? ही ब्रिटिश कुत्री आहे. फेकून टाका, जास्त कौतुक कशाला हवं” असं उदयनराजे म्हणाले.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता