एक फोन आला अन् त्यानंतर गोळी झाडून घेतली, आयुक्त मनोहरेंच्या नातेवाईकांचा दावा; काय घडलं?

0
1

लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी मध्यरात्री स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मनोहरे यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली. यामुळे कवटीचा भाग फुटून त्याचे काही तुकडे मेंदूत घुसले.त्यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली तरी प्रकृती गंभीर आहे. पुढील उपचारासाठी मनोहरे यांना मुंबईला हलवण्यात आलं आहे. मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनेला तीन दिवस झाले असून पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान, मनोहरे यांनी असं का केलं याचं गूढ अद्याप उलगडलेलं नाही.

बाबासाहेब मनोहरे यांच्या नातेवाईकांना दावा केला की, मनोहरे यांना कुणाचा तरी फोन आला. त्यावर बोलल्यानंतर काही वेळातच त्यांनी गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. फोन नेमका कुणाचा होता? फोनवर मनोहरे नेमकं काय बोलले याचा तपास पोलीस करत आहेत.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

मनोहरे यांचे दोन्ही फोन पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. फोनचा डेटा तपासला जाणार आहे. याशिवाय इतर माहिती मिळते का हे पाहिल्यानंतरच नेमकं स्पष्ट होऊ शकेल. मनोहरेंना फोन कोणाचा आला? फोनवर काय बोलणं झालं, त्या फोन कॉलमुळेच मनोहरेंनी हे पाऊल उचललं का यादृष्टीने पोलीस तपास करण्याची शक्यता वर्तवली जातेय.

आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर मनोहरे यांच्यावर लातूरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर रविवारी एअर अॅम्ब्युलन्सने मनोहरे यांना मुंबईला हलवण्यात आलं. गोळी झाडून घेतल्यानंतर कवटीच्या हाडाचे तुकडे मेंदूत अडकले होते. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली तरी अद्याप मेंदूच्या खाही भागात संवेदना कमी आहेत. त्यामुळे पुढील उपचारासाठी मुंबईतील कोकीळा बेन रुग्णालयात पाठवण्यात आलं असल्याची माहिती सह्याद्री हॉस्पिटलचे डॉक्टर हनुमंत किनीकर यांनी दिली.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर