न्यू आम्रपाली को. हौ. सोसायटी आणि जयंती उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने इफ्तार पार्टी संपन्न

0
1

मुंबई दि. ३० (रामदास धो. गमरे) समाजा-समाजात सर्वधर्मसमभावाची भावना अबाधित राहून सर्व जात, धर्म, पंथ एकत्रित येऊन त्यांमध्ये आपुलकी, बंधुता वाढून एकमेकांच्या आस्थेला, श्रद्धेला सन्मान देऊन गुण्यागोविंदाने शांततेने सर्व एकत्र राहिले पाहिजे या उदात्त उद्देशाने आम्रपाली को. ऑप. हौसिंग सोसायटी आणि सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ, ६ नंबर गेट, शिवडी यांच्या संयुक्त विद्यमाने इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

सदर इफ्तार पार्टीला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे स्थानिक आमदार अजय चौधरी, ए १ – एंटरप्रायझेस (बिल्डर आणि डेव्हलपर) यांचे सन्नान भाई, माजी नगरसेवक सुनील दादा मोरे, मुंबई काँग्रेसचे सचिव महेंद्र मुणगेकर, उबाठा नायगाव विधानसभा संघटक सुरेश साळे, शिवसेनेचे राजेश देशमुख, मारुती मंदिराचे पुजारी महाराज, आम्रपाली को. ऑप. हौसिंग सोसायटीचे चेअरमन व आर. पी. आय. नेते दिपकभाई गमरे, सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष संजय कसबे, मंडळाचे कार्यकर्ते दत्तात्रय वाघमारे, अमोल सोनावणे, संतोष लोखंडे, प्रताप तांबे, रुपचंद मोहिते, प्रविण तांबे, कामरान खान वली, दत्तात्रय वाघमारे, अमोल सोनवणे, संतोष लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

सदर इफ्तारमध्ये समाजातील सर्वच जात-धर्म-पंथाचे, सर्वच स्तरातील, विविध क्षेत्रातील लोक बंधुभाव नात्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर पार्टीचे सुनियोजित आयोजन करून सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अस्लम खान ,कामरान खान,रिजवान शेख, मुशर्रफ शेख, प्रवीण तांबे, रेखा आगाने, हमीद शेख ह्यांनी अथक परिश्रम घेऊन सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.