म्हसळा दि. २९ (रामदास धो. गमरे) बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती आणि समिती शाखा दिवाटप्पा ता. म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार, सरचिटणीस मनोहर बा. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्धाचार्यांचे प्रशिक्षण परीक्षा शिबीर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, बोर्लीपंचतन, ता. म्हसळा, जिल्हा रायगड येथे २५ मार्च ते २६ मार्च २०२५ या दोन दिवसांच्या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर बौद्धाचार्य प्रशिक्षण परीक्षा शिबिरात दिवाटप्पा विभागातील सात उपासक-उपासिका,आंबेट विभागातील एक उपासक, श्रीवर्धन विभागातील एक उपासक, माणगाव विभागातील दोन उपासक, गोरेगाव विभागातील एक उपासिका, म्हसळा विभागातील एक उपासक, तेली विभागातील एक उपासक अश्या एकूण चौदा बौद्ध उपासक-उपासिकांची लेखी व तोंडी परीक्षा घेण्यात आली असून ते सर्व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत, दिवाटप्पा विभागातील एकूण सात बौद्ध उपासक-उपासिका उत्तीर्ण झाल्याने त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. नवनिर्वाचित बौद्धाचार्या मध्ये सनद क्र. १८४ ते १९७ यात अनुक्रमे सुदर्शन रत्नदिप जाधव (दिघी), प्रतिक्षा प्रकाश कासारे (दिघी), निनाद राजेश कासारे (दिघी), कार्तिकी जनार्दन कासारे (दिघी), प्रथम संतोष नागावकर (दिघी), संदेश सुरेश पवार (बोर्लीपंचतन), भालचंद्र रामदास येलवे (खारगाव), अमोल श्रीपाल कवाडे (दांडगुरी), रूपेश दिपक गमरे (आंबेत), अनंत बाळाराम पवार (मांदाटणे), साक्षी संजय गायकवाड (वडगाव गोरेगाव), शैलेश कृष्णा मोरे (साई), विजय सोनू पवार (मांदाटणे), गंगाराम देवू गायकवाड (पेण) अश्या चौदा उपासक-उपासिकांनी सदर परीक्षेत यश संपादन केल्याने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे, त्यासोबतच दिवेटप्पा विभागातील १९ गावांतील सर्व ग्रामशाखा त्यांचे कार्यकर्ते, ग्रामस्थ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह बोर्लीपंचतनच्या कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले, तसेच दि. २५ व २६ मार्च २०२५ रोजी आयोजित शिबिराकरीता दादासाहेब चंद्रमणी मोरे यांनी स्वेच्छेने दोन दिवस भोजनदान दिले त्याबद्दल त्यांचे व यथाशक्ती धम्मदान करणाऱ्या सर्व दानवीरांचे तसेच प्रशिक्षण परिक्षेसाठी मुंबई वरून आलेले प्रशिक्षक संस्कार समिती अध्यक्ष आदरणीय मंगेशजी पवार आणि चिटणीस आदरणीय मनोहर बा. मोरे गुरूजीं आणि बौध्दाचार्य शिबिर आयोजित करण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते साकार करणारे पंचायत समितीचे सर्व कार्यकर्ते सभासद यांचे देखील मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.