मुंबई दि. ३१ (रामदास धो. गमरे) “बौद्ध धम्मियांचे श्रद्धास्थान महाबोधी महाविहाराचे (बोधगया, बिहार) संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या ताब्यात हवे परंतु अधिनियम बी.टी. १९४९ मुळे सदर महाविहार बौद्ध व हिंदू अश्या उभय धर्मियांच्या ताब्यात आहे, जे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १३, १४, १५, २५, २६ चे पूर्णतः उल्लंघन करणारे आहे तसेच अनुचित पद्धतीने बौद्धांच्या धार्मिक हक्कांवर अतिक्रमण करणारे आहे.
हिंदूंच्या मंदिरात हिंदूच पुजारी आणि त्यांचे व्यवस्थापन, ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये ख्रिश्चन फादर आणि त्यांचे व्यवस्थापन, मुसलमानांच्या मस्जिद, दर्ग्यामध्ये मुस्लिम मौलवी आणि त्यांचेच व्यवस्थापन असताना बौद्ध विहारात ब्राम्हणांच अतिक्रमण का ? सरकारने निर्माण केलेला बी. टी. १९४९ हा काळा कायदा रद्द करून महाबोधी महाविहारात ब्राम्हणी कर्मकांडामुळे बुद्धाची जी अवहेलना होते. ती थांबावी व आंदोलनासाठी आलेल्या बौद्ध भिख्खू संघावर जो अन्याय होत त्यांची उपेक्षा करीत त्यांना घाणीत बसवले जात आहे. हे अन्याय बंद होऊन जागतिक स्तरावर बौद्धांचे श्रद्धास्थान असलेले महाबोधी महाविहार बिहार बौद्ध व्यवस्थापनाच्या ताब्यात दयावे याकरता बौद्धजन पंचायत समितीचे सभापती सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी ९८वा चवदार तळे सत्याग्रह महाड क्रांतीदिनी महाड येथे बौद्ध बांधवांनी महाबोधी महाविहार मुक्ती महामोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन केले होते.
सम्यक कोकण कला संस्था (रजि.) महाराष्ट्र, या संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम कलावंत सदर महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतील त्यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कलावंतांनी सदर मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष मंदार कवाडे, नरेश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सम्यक कोकण कला संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात केले आहे.