सरकार केवळ जातीय दंगली भडकावण्याचे काम करतय! 100 दिवसात आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार; यशोमती ठाकूर यांचा दावा 

0
1

मुंबई : शंभर दिवसाच्या आत आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होईल असा दावा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांनी केलाय. सरकार केवळ जातीय दंगली भडकावण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. राज्यातील बिघडलेला सामाजिक सलोखा आणि सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांची जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सरकारवर टीका केली. फक्त रस्ते बांधून आणि कारखाने उभारून प्रगती होत नाही. राजापूरला जे घडलं ते खरोखरच खूप वाईट आणि वेदनादायक असल्याचे त्या म्हणाल्या.

ज्याला आदर्श शेतकऱ्याचा पुरस्कार त्याचीच पाण्याअभावी आत्महत्या

आता सरकारमध्ये जे सुरू आहे ते अतिशय धक्कादायक आहे. ज्या शेतकऱ्याला आदर्श शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला तोच पाण्याअभावी आत्महत्या करत आहे, शेतकऱ्याकडे काही बघायचं नाही तर फक्त जातीय दंगली भडकवायच्या आहेत. हा रंगाचा महोत्सव आहे, सर्व जातीधर्माचे लोक सणांमध्ये सहभागी होतात पण सत्ताधाऱ्यांमधील काहींना हे खुपत आहे, असे ठाकूर म्हणाल्या.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

दुसऱ्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल

शेतकऱ्याचं भलं करण्यासाठी निर्णय घेण्याची बुद्धी देवाने सरकारला द्यावी, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. शंभर दिवसाच्या आत एका मंत्राचा राजीनामा द्यावा लागतो. आता दुसऱ्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल. भ्रष्टाचारी लोक सत्तेत बसले आहे ही वास्तविकता आहे, असेही ठाकूर म्हणाल्या.

राजापूरच्या मशिदीबाहेर राडा, ठाकूर म्हणाल्या, काही लोक अशांतता पसरवण्यासाठीच

फक्त रस्ते बांधून आणि कारखाने उभारून प्रगती होत नाही. राजापूरला जे घडलं ते खरोखरच खूप वाईट आणि वेदनादायक आहे. नितेश राणेंसारखी मूर्ख माणसं या फडणवीसांच्या टोळीमध्ये केवळ अशा पद्धतीची अशांतता पसरवण्यासाठीच ठेवली आहेत. लोकशाहीसाठी अत्यंत घातक परिस्थिती आहे. संतांच्या महाराष्ट्रात असं घडेल असं कधी वाटलं नव्हतं, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

देशातील सध्याच्या धार्मिक उन्मादावर खासदार संजय राऊत यांनी कठोर टीका केली. देशात होळीला मशिदी झाकून ठेवण्याची, त्यावर अच्छादन टाकण्याची वेळ आलीय. हा संकुचितपणा देशाला आणि धर्माला परवडणारा नाही. देशाचा माहोल बिघडलाय, असा आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.